Mulund Toll Naka : मुलुंडच्या हरी ओम नगर रहिवाशांसाठी संपूर्ण टोल माफी; कोटेचा काय म्हणतात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हरी ओम नगरमधील रहिवाशांना मोफत कायमस्वरूपी टोल पास जारी करण्याची विनंती केल्यानंतर ही कार्यवाही एमएसआरडीसीकडून करण्यात आली आहे.

132
Mulund Toll Naka : मुलुंडच्या हरी ओम नगर रहिवाशांसाठी संपूर्ण टोल माफी; कोटेचा काय म्हणतात...

मुलुंड हरी ओम नगर येथील १० हजार रहिवाशांना लवकरच पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोल टोल नाका ओलांडण्यासाठी कोणताही टोल भरावा लागणार नाही. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ((MSRDC)) या विषयावर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. सध्या येथील रहिवाश्यांना टोलच्या २५ टक्के टोलची रक्कम भरावी लागत आहे. परंतु येथील रहिवाश्यांना संपुर्ण टोल माफी देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने ३१ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला. परंतु मागील दोन महिन्यात कोणताही निर्णय घेता न आलेल्या महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना आता उपरती झाली असून येथील १० हजार नागरिकांना आपण संपूर्ण टोल माफी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे सत्ता असूनही यावर निर्णय घेऊ न शकणाऱ्या युतीचे उमेदवार कसे करणार आश्वासनाची पूर्तता असा सवाल उपस्थित होत आहे. (Mulund Toll Naka)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून हरी ओम नगरमधील रहिवाशांना मोफत कायमस्वरूपी टोल पास जारी करण्याची विनंती केल्यानंतर ही कार्यवाही एमएसआरडीसीकडून (MSRDC) करण्यात आली आहे. फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीला “प्रस्ताव तयार करावा आणि टोल सवलतीसाठी पासेस देण्यात यावेत” असे निर्देश दिले अशी माहिती मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली आहे. (Mulund Toll Naka)

(हेही वाचा – IRCTC: आता जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरात जेवण मिळणार, तर ३ रुपयांत पाणी)

एमएसआरडीसीने प्रस्तावात हे केले नमूद

एमएसआरडीसीने (MSRDC) ३१ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हरी ओम नगर मधील रहिवाशांना संपूर्ण टोल माफी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावात एमएसआरडीसीने असे नमूद केले आहे की सध्या हरी ओम नगरच्या रहिवाशांना फक्त २५ टक्के रक्कम भरल्यानंतर मासिक टोल पास मिळतो. सामान्य प्रवाशांसाठी, एका टोल नाक्यावर मासिक पास हा १४१० रुपये एवढा आहे, तर हरी ओम नगर रहिवाशांसाठी तो फक्त ३५३ रुपये आहे. त्याचप्रमाणे, पाचही टोल नाक्यांसाठी सामान्य लोकांसाठी १६०० रुपये आणि हरी ओम नगर रहिवाशांसाठी ४०० रुपये मासिक पास आहे आहे, असे एमएसआरडीसीने प्रस्तावात नमूद केले आहे. एमएसआरडीसीने पुढे राज्य सरकारला संपूर्ण टोलमाफीबाबत निर्णय घेण्यास आणि त्याअनुषंगाने एमएसआरडीसीला (MSRDC) नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी केली आहे जेणेकरून ते हरी ओम नगर रहिवाशांसाठी संपूर्ण टोल माफीसाठी कंत्राटदाराला ती रक्कम देता येईल. (Mulund Toll Naka)

कोटेचा यांनी एमएसआरडीसीच्या (MSRDC) या निर्णयाचे स्वागत करून शक्य तितक्या लवकर संपूर्ण टोलमाफी मिळावी यासाठी मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करेन. “आमदार झाल्यानंतर मी हा पहिला मुद्दा हाती घेऊन विधानसभेत सुध्दा मांडला होता. मी आमचे आदरणीय नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना टोल माफीचे पास देण्याची सूचना केली. एमएसआरडीसीने हा प्रस्ताव पाठवल्यामुळे आता राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा निर्णय लवकर होण्यासाठी मी सर्व संबंधित विभागांशी पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन, असे कोटेचा यांनी सांगितले. भाजपा आणि महायुती सरकार हरी ओम नगरच्या मागण्याबाबत संवेदनशील आहे. “मी रहिवाशांना आश्वस्त करतो की आम्ही त्यांच्या समस्यांसाठी लढत आहोत आणि भविष्यातही लढत राहू, असेही कोटेचा म्हणाले. (Mulund Toll Naka)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.