Lok Sabha Election 2024 : मतदान वाढविण्यासाठी भाजपाने शोधून काढला रामबाण उपाय

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना सूर्यास्तापूर्वी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य घटकांना देण्यात आल्या आहेत.

261
Lok Sabha Election 2024 : मतदान वाढविण्यासाठी भाजपाने शोधून काढला रामबाण उपाय

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता बळावली आहे. भारतीय लोकशाहीच्या या महोत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे, असे भारतीय जनता पक्षाला वाटते. यामुळे भाजपाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हुकमी उपाय शोधून काढला आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाले होते. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगासह सरकार आणि भाजपा अस्वस्थ झाला होता. यामुळे भाजपाने मतदानाची टक्केवारी कशी वाढविता येईल, यावर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नुकतीच गंभीर चर्चा केली. (Lok Sabha Election 2024)

दुसऱ्या टप्प्यातील मतदान वाढवण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आणि वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपआपली मते मांडली. भाजपाचे (BJP) बुथ व्यवस्थापन नीट नसून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत महासचिव यांनी व्यक्त केले. ही बैठक पहाटे ४ वाजेपर्यंत चालली होती, हे येथे उल्लेखनीय. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने आता कार्यकर्ते आणि बुथ व्यवस्थापन करणाऱ्या लोकांमध्ये उत्साहाचा संचार करण्याचा निर्णय घेतला आहे. बुथ व्यवस्थापन नीट करण्यासाठी भाजपासुध्दा कठोर झाला आहे. भाजपाने बूथ स्तरावरील कार्यकर्ते आणि पन्ना प्रमुखांना सक्रीय करण्यासाठी आवश्यक पाउले उचलण्याची ताकीद राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाग्यनगर (हैदराबाद) येथे भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याचे आवाहन)

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना सूर्यास्तापूर्वी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य घटकांना देण्यात आल्या आहेत. कडक उन्हामुळे सर्वच विभागांच्या मतदानात घट झाली असली तरी पक्षाला आणखी एक चिंता आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात पक्षाच्या पारंपारिक मतदार विभागातील मतदानाची टक्केवारीही कमी झाली आहे. आपल्या समर्थक मतदारांनी कोणत्याही किंमतीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे अशी पक्ष नेतृत्वाची इच्छा आहे. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्ते आणि पन्नाप्रमुखांना सक्रिय करावे. (Lok Sabha Election 2024)

मतदानाची वेळ वाढविण्याची मागणी करणार

भाजपा (BJP) निवडणूक आयोगाकडे मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी करणार आहे. मतदारांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी मतदानाची वेळ वाढवून मतदान केंद्रांवर कुलर बसवण्यासह इतर उपाययोजना करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. (Lok Sabha Election 2024)

बूथ व्यवस्थापन चांगले नव्हते

पक्षाच्या एका सरचिटणीसाने पहिल्या टप्प्यात बूथ व्यवस्थापनात अनेक पातळ्यांवर कमतरता असल्याचे मान्य केले. तेही गेल्या वर्षभरापासून बूथ व्यवस्थापनावर पक्ष सर्वाधिक भर देत असताना. त्यामुळे बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविण्यास सांगितले आहे. युपीतील आठ जागांवर कमी मतदान झाल्यामुळे पक्ष चिंतेत आहे. तिकीट वाटपातील असंतोषामुळे राजपूत आणि त्यागी समाजातील एक वर्ग मतदान केंद्रापर्यंत पोहोचला नसल्याचे मानले जात आहे. काही जागांवर मुस्लिम मतदारही घरातून कमी बाहेर पडले आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.