Lok Sabha Election 2024 : भाग्यनगर (हैदराबाद) येथे भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याचे आवाहन

372

भाग्यनगर (हैदराबाद) या लोकसभा मतदार संघात (Lok Sabha Election 2024) एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात भाजपाने सामाजिक कार्यकर्त्या, प्रखर हिंदुत्ववादी माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी माधवी लता यांचा प्रचार जोरदार सुरु आहे. या ठिकाणी अधिकाधिक हिंदूंनी माधवी लता यांना सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातून भाग्यनगर येथे माधवी लता यांच्या निवडणूक प्रचाराला येण्याचे आवाहन हर घर सावरकर समितीने केले आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : वायनाडमध्ये राहुल गांधींची लिटमस टेस्ट)

माधवी लता यांचा प्रचार करणे हिंदूंचे उत्तरदायित्व 

संस्थेचे देवव्रत बापट यांनी हे आवाहन केले आहे. आपण सर्व जण भाग्यनगर येथील परिस्थिती जाणतो. तेथील जनतेने यापूर्वी निजामाचे अनन्वित अत्याचार सहन केले आहेत आणि आजही त्याच रझाकरांचे चेले राजकारणात सक्रिय आहेत. ही निजामशाही संपविण्यासाठी माधवी लता यांना भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उमेदवारी जाहीर झालेली आहे. एक सामान्य हिंदू म्हणून सामाजिक काम करणाऱ्या माधवी लता यांनी गोवर्धन पर्वत उचलण्याचा निर्धार केला आहे. त्यांना सहकार्य करणे हे आपणा सर्व हिंदूंचे कर्तव्य आहे. लोकतंत्राच्या माध्यमातून सुशासन आणू इच्छित असलेल्या माधवी लता यांचा प्रचार करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. त्यांची साथ देणे हे समस्त हिंदूंचे कर्तव्य समजून हे कार्य करावे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ह्या उक्तीला जगण्याची आज एक संधी आपल्याला मिळत आहे तर ह्या संधीचे आपण अवश्य सोने करावे. परंतु हा प्रचार आपल्या घरी राहून अथवा ऑनलाईन पद्धतीने न करता स्वतः भाग्यनगर येथे जाऊन करता यावा, यासाठी आपण योजना आखत आहोत. तरीही ज्यांना भाग्यनगर येथे जाऊन काही दिवस प्रचार करणे शक्य असेल त्यांनी कृपया प्रचार स्वरूपात या रणरागिणीला मदत करावी. इच्छुकांनी आपली नावे कळवावीत, असे आवाहन बापट यांनी केले आहे. याकरता पुढील नियोजन व इतर सूचनांसाठी https://chat.whatsapp.com/Drokz8xvvkA6E4sTH8udmg हा WhatsApp ग्रुप बनवण्यात आला आहे. ज्यांना भाग्यनगर येथे जाऊन प्रचार करण्याची इच्छा असेल त्यांनी हा ग्रुप जॉईन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.