शाहू शहाजी छत्रपती यांना AIMIM चा पाठिंबा; महाराज पुन्हा आले चर्चेत

123

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यात कोल्हापूर लोकसभा मतदार संघ जोरदार चर्चेत आला आहे. कारण याठिकाणी काँग्रेसच्या तिकिटावरून छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू शहाजी छत्रपती निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे त्यांना कट्टर इस्लामचे समर्थन करणाऱ्या AIMIM या पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे महाराज पुन्हा चर्चेत आले आहेत.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : भाग्यनगर (हैदराबाद) येथे भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याचे आवाहन)

कोल्हापुरातील मतदारानेही व्यक्त केली नाराजी 

नुकतेच सोशल मीडियात कोल्हापुरातील एका मतदाराची फोनवरील संभाषणाची क्लीप व्हायरल झाली आहे. शाहू महाराज छत्रपती अर्थात शाहू शहाजी छत्रपती हे त्यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी जाणार होते, तेव्हा कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे याकरता त्यांच्या कार्यालयातून कोल्हापुरातील मतदारांना फोन करून संपर्क केला जात होता. त्यावेळी एका मतदाराने मांडलेली मते सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आम्हाला गादीचा सन्मान आहे पण महाराज ज्यांचे ३७० कलमला समर्थन आणि राम मंदिराला विरोध आहे अशा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे, याचे वाईट वाटले, असे तो मतदार म्हणत आहे.

या ऑडिओ क्लीपमुळे महाराज चर्चेत आले असतानाच आता महाराजांना कट्टर इस्लामचे समर्थन करणाऱ्या AIMIM पक्षाने पाठिंबा दिल्याने महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.