CM Eknath Shinde : उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतून, ठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे 'वॉटर स्क्रीन'सह आहेत. त्यावर, दाखविण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत.

151
CIDCO : नवी मुंबईतील सिडकोच्या इमारतींना नवी अभय योजना; मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. (CM Eknath Shinde)

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतून, ठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे ‘वॉटर स्क्रीन’सह आहेत. त्यावर, दाखविण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. त्यांचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिर, असे या शोंचे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर करण्यात आले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Deepak Kesarkar : वाढीव पदांवरील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत)

शो विनामूल्य करा – मुख्यमंत्री

ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहे, रस्ते अधिक चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचे आहे, असे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायला, फिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना असे कारंजे ठाण्यात करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवले, असेही मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी नमूद केले. तसेच, येथील शो विनामूल्य ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माझ्या मतदारसंघाला, ठाण्याला भरभरुन दिले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. अशी आणखी दोन संगीतमय कारंजी लवकरच सुरू होतील, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याप्रसंगी दिली. याच कार्यक्रमात, चित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्री यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा तसेच, संदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.