Deepak Kesarkar : CBSE शाळांना महाराष्ट्र सरकार अनुदान देणार; ‘हे’ आहे कारण

Deepak Kesarkar : सैनिक शाळांमध्ये राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असतो, त्यामुळे मराठी शाळांतील विद्यार्थी एनडीएच्या परीक्षेत नापास होतात. हे टाळण्यासाठी नवे धोरण जाहीर करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

227
Deepak Kesarkar : CBSC शाळांना महाराष्ट्र सरकार अनुदान देणार
Deepak Kesarkar : CBSC शाळांना महाराष्ट्र सरकार अनुदान देणार

राज्यातील अनेक सैनिक शाळांमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. एनडीएच्या (NDA) परीक्षांमध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी एनडीएच्या परीक्षांमध्ये पास होत नाहीत. त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे. या धोरणामुळे सीबीएसईच्या (CBSE) शाळांना महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार आहे, असे माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : ‘विकसित भारत’ लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण व आरोग्य व्यवस्था आवश्यक)

मुलींच्या सैनिक शाळेला परवानगी देणार

नागपुर येथील भोसला सैन्य शाळेच्या (Bhosla Military School) 25 व्या वार्षिक उत्सवात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. त्या वेळी केसरकर बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित होते.

या वेळी दीपक केसरकर यांनी मुलींच्या सैनिक शाळेला अनुकूलता दर्शवली. ते म्हणाले, ”भोसला सैनिक शाळेने मुलींच्या सैनिक शाळेला परवानगी मागितली आहे. ती परवानगी एका महिन्याच्या काळात मिळेल.”

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : ‘या’ देशाने 22 जानेवारीला दिली जाहीर सुट्टी)

जगाला कुशल मनुष्यबळ पुरवण्याची भारताची क्षमता – दीपक केसरकर

जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर देशातील भाषा शिकाव्या. महाराष्ट्रातील मुलांमध्ये काहीही कमी नाही. एक कमतरता आहे, ती म्हणजे कामाचा कमीपणा मानण्याची वृत्ती. परदेशातील मुले कोणतेही काम करण्यासाठी कमीपणा मानत नाहीत, असे म्हणून दीपक केसरकर यांनी मराठी मुलांना प्रोत्साहित केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.