Sagar Mahotsav : सागर महोत्सवात विद्यार्थ्यांनी अनुभवली समुद्री जैवविविधता; व्याख्याने, लघुपट यांच्या माध्यमातून जागृती

Sagar Mahotsav : रत्नागिरीतील सागर महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर करण्यात आला.

157
Sagar Mahotsav : सागर महोत्सवात विद्यार्थ्यांनी अनुभवली समुद्री जैवविविधता; व्याख्याने, लघुपट यांच्या माध्यमातून जागृती
Sagar Mahotsav : सागर महोत्सवात विद्यार्थ्यांनी अनुभवली समुद्री जैवविविधता; व्याख्याने, लघुपट यांच्या माध्यमातून जागृती

समुद्रात खूप खोलवर जाऊन तिथले काही सॅंपल्स गोळा करून त्यांचा उपयोग संशोधनकार्यासाठी केला जातो. नियंत्रित मार्गाने व जलचर, सेल संस्कृती, रासायनिक संश्लेषण आणि आनुवांशिक अभियांत्रिकी यांच्या माध्यमातून मरीन बायोटेक्नॉलॉजीचा (Marine Biotechnology) वापर करणे शक्य आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांनी दिली. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे (Asmant Benevolence Foundation) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मरीन बायोटेक्नॉलॉजीवर बोलत होते. (Sagar Mahotsav)

(हेही वाचा – AC Local : भिकारी तसेच बाल फेरीवाल्यांमुळे एसी लोकलमधील प्रवाशी हैराण)

धाडसी मोहिमा राबवण्याची गरज

डॉ. डामरे यांनी समुद्रात मिळणाऱ्या विविध गोष्टींविषयी माहिती दिली. तसेच बायोटेक्नॉलीजीचा (Biotechnology) इतिहास, समुद्रात होणारे संशोधन, त्यातील आव्हाने यावर इत्थंभूत माहिती दिली. चांद्रयान मोहिमेप्रमाणे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनेही (National Institute Of Oceanography) यापूर्वी समुद्राच्या तळाशी जाऊन मोहीम राबवली आहे; परंतु तेथे खूप मोठे आव्हान आहे. यापुढेही अशा धाडसी मोहिमा राबवण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांनी केले.

व्याख्याने, किनाऱ्यावरील जैवविविधतेवरील लघुपट

आज दिवसभरात सागर महोत्सवात भाट्ये किनाऱ्यावर अभ्यास सहलीत प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांनी मार्गदर्शन केले. कोरल्सवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. मंदार नाणजकर यांनी व्याख्यान दिले. कोरल्सच्या अभ्यासातून सृष्टीला होणारा फायदा, त्यांच्या अभ्यासाची गरज यावर डॉ. नाणजकर यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर खारफुटीची (Mangroves) गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर यांनी व्याख्यान दिले. यावेळी गोदरेज मॅंग्रूव्हजने बनवलेले खारफुटीवरील व्हिडीओ व खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेवरील लघुपट दाखवण्यात आले. सायंकाळी पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.

(हेही वाचा – Fire : पुण्यातील मार्केटयार्डकडील आंबेडकर नगर झोपडपट्टीला लागली आग)

सागर महोत्सवाची (Sagar Mahotsav) उद्या (दि. १४ जानेवारी) सांगता होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता होडीमधून कर्ला येथील खाडी परिसरात खारफुटी अभ्यास फेरी काढण्यात येणार आहे. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सांगता समारंभ होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.