Fire : पुण्यातील मार्केटयार्डकडील आंबेडकर नगर झोपडपट्टीला लागली आग

172

पुण्यातून एक आगीची घटना समोर आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या ११ क्रमांकाच्या गल्लीत आगीची (Fire) घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमनच्या 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या झोपडपट्टीत अतिशय चिकटून घर आहेत. त्यामुळे ही आग (Fire) लवकर पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने वेगाने प्रयत्न सुरु केले आहेत. या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली आहे कि नाही हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

(हेही वाचा Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे का? अखेर पुरीच्या शंकराचार्यांनी केला खुलासा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.