Police : गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली 5 लाखांची लाच

135

जागेच्या अनुषंगाने समोरील व्यक्तीने दिलेली तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल 5 लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता 3 लाख घेण्यास संमती दर्शविल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मनोहर मोरे याला बुधवार, १२ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत संजय मोरे यांच्याविरुद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही, हे विशेष तो सध्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याला त्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

(हेही वाचा कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोबाईल फोन; ‘या’ तुरुंगातून ३० हुन अधिक मोबाईल फोन जप्त, तुरुंग अधीक्षक निलंबित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.