कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोबाईल फोन; ‘या’ तुरुंगातून ३० हुन अधिक मोबाईल फोन जप्त, तुरुंग अधीक्षक निलंबित

186
कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोबाईल फोन; 'या' तुरुंगातून ३० हुन अधिक मोबाईल फोन जप्त, तुरुंग अधीक्षक निलंबित
कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोबाईल फोन; 'या' तुरुंगातून ३० हुन अधिक मोबाईल फोन जप्त, तुरुंग अधीक्षक निलंबित

तुरुंगात मोबाईल फोन वापरण्यावर आणि बाळगण्यावर बंदी असतानादेखील राज्यातील काही तुरुंगात कैद्यांच्या बॅरेकमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तुरुंगात मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन मिळत असल्याची गंभीर दखल वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांनी घेतली असून याप्रकरणी कल्याणच्या आधारवाडी तुरुंग अधिक्षकासह चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येरवडा तुरुंगातील अधिकाऱ्यासह १४ जणांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी देखील लावण्यात आली.

कल्याणच्या आधार वाडी तुरुंगातील कैद्यांच्या वेगवेगळ्या बॅरेकमधून दोन आठवड्यांपूर्वी चार दिवसाच्या कालावधीत १५ पेक्षा अधिक मोबाईल फोन सर्कल अधिकारी यांनी जप्त केले होते. याप्रकरणी तुरुंग अधीक्षक अंकुश सदाफुले यांना याबाबत सूचना देऊन देखील तुरुंग अधीक्षक सदाफुले यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले नाही. अखेर तुरुंगातील सर्कल अधिकारी यांनी ही बाब वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्दशनात आणून दिली होती. दरम्यान कोल्हापूर मध्यवर्ती तुरुंगात देखील कैद्यांच्या बॅरेक मध्ये ६ मोबाईल फोन मिळाले होते, तसेच येरवडा मध्यवर्ती तुरुंगात १० मोबाईल फोन मिळाले होते. या सर्व प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून घेण्यात आली, अखेर गेल्या आठवड्यात आधारवाडी तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक अंकुश सदाफुले यांना निलंबित करून त्यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – जीएसटी पर‍िषदेच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये ७ अपीलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता)

तसेच कोल्हापूर तुरुंगात मिळालेल्या मोबाईल फोन प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असून येरवडा तुरुंगात मिळालेल्या १० मोबाईल प्रकरणी कारागृहातील अधिकारी यांच्यासह १४ जणांची तडकाफडकी बदली करून त्यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असल्याची माहिती उपमहानिरीक्षक (कारागृह) स्वाती साठे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली. कोल्हापूर आणि येरवडा तुरुंगात मिळालेल्या मोबाईल फोन प्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस ठाणे करीत असल्याचे उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.