Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न

155
Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न
Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न

झाडावर लाइटिंग करणे त्याच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे सस्तन प्राणी व पक्ष्यांना घरटे बांधण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, अशी याचिका रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. झाडांवरून वायर हटविण्यात याव्यात, लोकांमध्ये या मुद्द्यावरून जागृती निर्माण करावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार (Devendra Kumar) उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. (Bombay High Court)

(हेही वाचा- S Jaishankar: नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा)

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

या वेळी राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर पालिकेला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्याने याचिकेद्वारे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केल्याने आम्ही राज्य सरकार, मुंबई महापालिका (Mumbai Municipality), ठाणे महापालिका (Thane Municipality) आणि मीरा-भाईंदर महापालिकेला (Mira-Bhayander Municipal Corporation) याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत आहोत, असे न्यायालयाने म्हटले. (Bombay High Court)

(हेही वाचा- Mumbai Metro : आता मेट्रोने करता येणार चक्क विनातिकीट प्रवास !; काय आहे सुविधा ?)

सुनावणीदरम्यान दिल्ली वन विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा हवाला जोशी यांच्या वकील रोनीता भट्टाचार्य (Ronita Bhattacharya) यांनी खंडपिठाला दिला. या परिपत्रकाद्वारे झाडांवर लावले जाणारे साईनबोर्ड्स, हायटेंशन केबल्स, विद्युत तारा यांमुळे झाडाला होणारी हानी तपासण्यासाठी काही उपाययोजना आखल्या. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशाच्या आधारे हे परिपत्रक जारी करण्यात आले, अशी माहिती भट्टाचार्य यांनी न्यायालयाला दिली. (Bombay High Court)

परवानगी घ्यावी लागेल

महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण आणि जतन कायदा, १९७५ मध्ये झाड जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे हानी पोहोचविण्यास मनाई करण्यात आली आहे. झाडे तोडण्यासाठीही पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर झाडावर लाइटिंग लावल्यास झाडाचे नुकसान होते. त्यामुळे परवानगी घेतल्याशिवाय झाडांना लाइटिंग करता येणार नाही, असा युक्तीवाद वकील रोनीता भट्टाचार्य (Ronita Bhattacharya) यांनी केला आहे. घेतला होता. पण आज या गावाचा विकास झाला नाही. (Bombay High Court)

(हेही वाचा- Rajkumar Anand : भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत नाव नोंदवायचे नाही; राजीनामा देतांना काय म्हणाले आपचे मंत्री)

देशात 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झालं व केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली. तेव्हा पासून आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेण्याची परंपरा सुरू झाली. भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर तालुक्यातील जैतपुर गाव दत्तक घेतले. स्थानीय विकास निधीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होणार होता अशी आश्वासन खासदार महोदयांनी गावकऱ्यांना दिली. पण गाव दत्तक फक्त कागदावर घेतला. प्रत्यक्षात खासदार साहेब गावात कधी फिरकलेच नाही. आता गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पाणी पुरवठा योजना आहे. पण गावकऱ्यांना पिण्याच पाणी मिळत नाही. गावात 2019 पुर्वी ज्या समस्या आहेत. त्याच समस्या आजही कायम आहेत असे गावकरी सांगत आहेत. (Bombay High Court)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.