Rajkumar Anand : भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत नाव नोंदवायचे नाही; राजीनामा देतांना काय म्हणाले आपचे मंत्री

122
Rajkumar Anand : भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत नाव नोंदवायचे नाही; राजीनामा देतांना काय म्हणाले आपचे मंत्री
Rajkumar Anand : भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत नाव नोंदवायचे नाही; राजीनामा देतांना काय म्हणाले आपचे मंत्री

मी या पक्षाचा, सरकारचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. कारण मला भ्रष्टाचाराच्या व्यवहारांत आपले नाव नोंदवायचे नाही. आमच्याकडे शासन चालवण्याची नैतिक ताकद शिल्लक राहिली आहे असे मला वाटत नाही, असे आरोप करत दिल्लीचे समाजकल्याणमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांनी मंत्रीपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

(हेही वाचा – Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ? एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र)

आप भ्रष्टाचाराच्या दलदलीत

राजीनामा देतांना राजकुमार म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) जन्म झाला. मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे.

दलितांना आपमध्ये प्रतिनिधित्व नाही

राज कुमार आनंद यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर इतर कोणत्याही पक्षात जाण्याची शक्यता नाकारली. तसेच आपवर अनेक आरोप केले आहेत. “बाबासाहेबांमुळेच मंत्री झालो. दलितांना आम आदमी पक्षात प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 2020 मध्ये आमदार झालेले राज कुमार यांच्याकडे समाजकल्याण व्यतिरिक्त अनेक मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली होती. ‘आप’च्या प्रमुख नेत्यांमध्ये दलित नेते नाहीत. दलित आमदार, नगरसेवक आणि मंत्र्यांना पक्ष मान देत नाही. अशा स्थितीत सर्व दलितांना फसवणूक झाल्याचे वाटते, असे आरोप राज कुमार आनंद यांनी केले आहेत.

राजकुमार यांनी राजीनामा दिल्याप्रकरणी प्रतिक्रिया देतांना आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. आम्ही पहिल्या दिवसापासून एक गोष्ट सांगत आलो आहोत की, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागे आम आदमी पक्ष फोडण्याचा हेतू आहे, असे आरोप सिंह यांनी केले आहेत.

केजरीवालांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी नाही

दरम्यान, ईडीच्या अटकेला आव्हान देणारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, मी त्यांची याचिका तातडीने सूचिबद्ध करण्याच्या विनंतीवर विचार करणार आहे. (Rajkumar Anand)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.