Lok Sabha Election 2024 : ‘बुलडोझर’ चिन्ह लोकसभा निवडणुकीत वापरता येणार नाही

निवडणूक प्रचारात पारदर्शकता वाढावी, यासाठी होर्डिंग व मुद्रित साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे स्पष्टपणे नोंदवावीत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या.

147
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?

अलीकडच्या काळात चर्चेचा विषय ठरलेला ‘बुलडोझर’ (Bulldozer) लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह म्हणून वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या यादीतून बुलडोझर चिन्ह हटवले आहे. मात्र, ‘रोड रोलर’ (Road roller) हे चिन्ह म्हणून घेता येईल. मोबाइल फोन हे चिन्ह म्हणून घेता येणार नसले, तरी या यादीत लॅपटॉप, कम्प्युटर, माऊस, कॅल्क्युलेटर, सीसीटीव्ही, दूरदर्शन संच, ट्यूबलाइट यांना परवानगी मिळाली आहे. अपक्षांना निवडणूक चिन्ह म्हणून वापरता येणाऱ्या सुमारे १९० वस्तूंची यादी आयोगाने अलीकडेच संकेतस्थळावर जारी केली. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न)

निवडणूक प्रचारात पारदर्शकता वाढावी, यासाठी होर्डिंग व मुद्रित साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे स्पष्टपणे नोंदवावीत, अशा सूचना निवडणूक आयोगाने बुधवारी दिल्या. आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या कलम १२७-अ चा हवाला दिला आहे. यानुसार मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता न छापता निवडणूक पत्रके, पोस्टर्स किंवा बॅनर छापण्यास किंवा प्रकाशित करण्यास मनाई असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आम आदमी पक्षाने या मुद्द्यावर नुकतीच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. (Lok Sabha Election 2024)

बुलडोझरला (Bulldozer) मनाई, ‘रोड रोलर’ला मान्यता आणि मोजे यांबरोबरच बांगड्या, मोत्यांचा हार, कानातले, अंगठी यांचीही निवडणूक चिन्हांत भर पडली आहे. सफरचंद, फळांची टोपली, बिस्किटे, ब्रेड, केक, सिमला मिरची, फ्लॉवर, नारळ, आले, द्राक्षे, हिरवी मिरची, आइस्क्रीम, फणस, भेंडी, नूडल्स, शेंगदाणे, वाटाणे या यादीत आहेत. अक्रोड आणि टरबूज यांचाही यात समावेश आहे. बेबी वॉकर, कॅरम बोर्ड, बुद्धिबळाचा पट, कलर ट्रे, ब्रश, हातगाडी, स्कूल बॅग, लुडो, जेवणाचा डबा, पेन स्टँड, पेन्सिल बॉक्स, शार्पनर यांचाही निवडणूक चिन्ह म्हणून वापर केला जाईल. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Ajit Pawar: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले अजितदादा; वाचा सविस्तर)

अन्य काही वस्तू अशा

वातानुकूलन यंत्र (एअर कंडिशनर), डोली, टाइपरायटर, खाट, विहीर, टॉर्च, पाटी, फळा, चिमणी, पेनची नीब, टेलिफोन, ग्रामोफोन, पोस्टाची पेटी, ड्रिल मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, पेन ड्राइव्ह, ब्रेड टोस्टर, रिमोट, स्पॅनर, स्टेपलर, स्टेथोस्कोप, एक्स्टेंशन बोर्ड, माईक, मिक्सर, स्विच बोर्ड, सीरिंज, फ्राईंग पॅन, हेडफोन, हेल्मेट, रोबो, रूम कुलर, हीटर, कपाट, ऑटो-रिक्षा, फुगा, बॅट, बेंच, सायकल पंप, दुर्बीण, माणूस आणि सेलिंग बोट, बॉक्स, विटा, ब्रीफकेस, ब्रश, बादली, डिझेल पंप, डिश अँटेना, डॉली, गॅस सिलेंडर, गॅस स्टोव्ह, प्रेस, किटली, किचन सिंक, पॅन, पेट्रोल पंप, फोन चार्जर, प्रेशर कुकर, पंचिंग मशीन, करवत, कात्री, शिलाई मशीन, पाण्याचे भांडे, सोफा सेट, टेबल. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.