S Jaishankar: नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

128
S Jaishankar: नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा
S Jaishankar: नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, “नेहरूंमुळेच (Jawaharlal Nehru)भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) स्थायी सदस्य बनता आले नाही. भारताऐवजी चीनला ही संधी मिळाली. नेहरूंनी (Jawaharlal Nehru)भारतापेक्षा चीनला महत्त्व दिले होते, आणि चीनच्या स्थायी सदस्य बनवण्याच्या बाजूने होते. चीन आधी स्थायी सदस्य होईल, नंतर भारत होईल. असं नेहरू तेव्हा म्हणाले होते. पण जर मी (S Jaishankar) पंतप्रधान झालो असतो तर, सर्वात आधी देशाचे हित पाहिले असते.” असे एस जयशंकर म्हणाले. (S Jaishankar)

(हेही वाचा – )Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ? एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

सीमेपलिकडचा दहशतवाद सहन करण्याचा काळ आता संपलाय

“अनेक वर्षं भारताने सीमेपलीकडील दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ संपला आहे. यापूर्वी नागरिकांच्या मनात सुरक्षेचा प्रश्न सतत राहायचा. भारताने अनेक वर्षं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ निघून गेला आहे. पूर्वीचे आणि आजचे नेतृत्व यात खूप मोठा फरक आहे. आता मोदींचे नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली १० वर्षात सर्वात मोठा बदल झाला आहे.” (S Jaishankar)

(हेही वाचा – Mumbai Crime : एका अनोळखी पत्राने उलगडला १८ महिन्यांच्या मुलीच्या खुनाचा गुन्हा)

“आज देश खंबीर नेतृत्वाच्या हाती आहे आणि निर्णयांमध्ये पूर्ण स्पष्टता आहे. मोदींच्या आधी २००८ मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला आणि मुंबई हादरली होती. आजच्या भारतात सीमेपलीकडून कोणतीही दहशतवादी घटना घडली तर, आम्ही उरीसारखी प्रतिक्रिया देतो.” असं एस जयशंकर (S Jaishankar) यांनी म्हटलं आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.