BMC Budget 2024-25 Best: बेस्टला ९२८ कोटी रुपयांचे अनुदान

महानगरपालिकेच्या सन २०२४-२५ वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून ८०० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी सन २०२४ -२५च्या अर्थसंकल्पाद्वारे स्पष्ट केले.

1434
Bmc Budget 2024 -25 Best : बेस्टला ९२८ कोटी रुपयांचे अनुदान
Bmc Budget 2024 -25 Best : बेस्टला ९२८ कोटी रुपयांचे अनुदान
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

तोट्यात चाललेल्या बेस्टला (Bmc Budget 2024 -25 Best) उपक्रमाला महापालिकेच्या वतीने आर्थिक सहाय्य केले जात असून आगामी वर्षांतही एकूण ९२८ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये विविध कारणांसाठी ८०० कोटी रुपये इलेक्ट्रीक बसेस खरेदीसाठी महापालिकेच्या हिश्श्यातील १२८ कोटी रुपये अशा प्रकारे एकूण ९२८ कोटी रुपयांचे अनुदान महापालिका बेस्टला उपलब्ध करून देणार आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, बेस्ट उपक्रमास पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्त्वावरील (Wet Lease)नवीन बसेस घेणे, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च भागविणे, आयटीएमएस प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी देणे, विद्युत देणी अदा करणे, इत्यादीकरिता महानगरपालिकेच्या सन २०२४-२५ वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून ८०० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी सन २०२४ -२५च्या अर्थसंकल्पाद्वारे स्पष्ट केले.

(हेही वाचा – Bmc budget 2024-25: आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग सुपरफास्ट करण्यासाठी प्रयत्न, पण टोल रकमेत नाही मागितला महापालिकेने हिस्सा )

२००० इलेक्ट्रीक बसगाड्या सुरू करण्याचे नियोजन
तसेच मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २००० इलेक्ट्रीक बसगाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा खर्च २५७३ कोटी इतका असून त्यासाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या खरेदीसाठी ७० टक्के म्हणजेच ११८०१ कोटी इतकी रक्कम जागतिक बँकेकडून सॉफ्ट लोनच्या स्वरुपात बेस्ट उपक्रमास प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे एकूण प्रकल्प खर्चाच्या २५टक्के हिस्सा म्हणजेच ६४३.३५ कोटी एवढी रक्कम राज्य शासनाकडून बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार असून उर्वरीत ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी एवढी रक्कम महानगरपालिकेने देण्याबाबत राज्य शासनामार्फत कळविण्यात आले आहे. त्यानुसार, सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमाला अतिरिक्त अनुदान म्हणून १२८.६५ कोटी इतकी तरतूद करण्यात आली असल्याचे चहल यांनी नमुद केले आहे.

नवीन इलेक्ट्रीक बसेस
बेस्ट उपक्रमाकडे सध्या ३००० बसेसचा ताफा असून २००० नवीन इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे सन २०२५पर्यंत बेस्टच्या ताफ्यात बसेसची संख्या ५८०० एवढी आहे, तर अजूनही काही बसेस खरेदी केल्या जाणार असल्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या मार्च २०२६ पर्यंत ८००० एवढी होईल, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.