IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याने तिलक वर्मावर जाहीर टीका करणं किती योग्य?

IPL 2024 Hardik Pandya : हार्दिकच्या नेतृत्व क्षमतेवर यंदाच्या हंगामात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 

141
IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याने तिलक वर्मावर जाहीर टीका करणं किती योग्य?
  • ऋजुता लुकतुके

या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाची नेतृत्वाची धुरा रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रुचला नव्हता. त्यातूनच हार्दिकचं मैदानात ट्रोलिंग सुरू झालं. पण, हार्दिकनेही मैदानात घेतलेले काही निर्णय वादग्रस्त आणि त्यामुळे त्याच्या कप्तानीवर प्रश्नचिन्ह उभे कऱणारे ठरले आहेत. (IPL 2024 Hardik Pandya)

अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सामन्यागणिक केलेले बदल, जसप्रीत बुमराला सुरुवातीला गोलंदाजी न देणं, क्षेत्ररक्षणामध्ये अनावश्यक बदल, स्वत:च्या फलंदाजी क्रमात वारंवार केलेले बदल असे सगळे निर्णय हे संघाला अंगलट आले आहेत. आणि त्यावर टीकाही झाली आहे. आता एक ताजं प्रकरण घडलंय ते सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संघ सहकारी तिलक वर्माबद्दलच्या त्याच्या प्रतिक्रियेमुळे. (IPL 2024 Hardik Pandya)

शेवटच्या सामन्यात मुंबईचा दिल्ली कॅपिटल्सकडून दहा धावांनी पराभव झाला आणि या सामन्यात मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या त्या तिलक वर्माने. ३२ चेंडूंत ६३ धावा करूनही तिलकला कर्णधाराचा जाहीर रोष पत्करावा लागला. शेवटच्या षटकांत पुरेशी आक्रमक फलंदाजी त्याने केली नाही, असं हार्दिकने (Hardik Pandya) जाहीरपणे बोलून दाखवलं. (IPL 2024 Hardik Pandya)

(हेही वाचा – IPL 2024, CSK vs SRH : चेन्नईच्या विजयात धोनीचा हा अनोखा विक्रम साकार)

म्हणून रिषभ पंतने अक्षरला गोलंदाजीपासून हटवलं

‘अक्षर पटेल डावखुऱ्या तिलकला गोलंदाजी करत होता, तेव्हा तिलकने अक्षरवर चढाई करणं अपेक्षित होतं. पण, तिलकचा अनुभव कमी पडला आणि त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसला,’ असं हार्दिक (Hardik Pandya) म्हणाला. पण, ही टीका कितपत योग्य होती? कारण, तिलक वर्माने अक्षरच्या ६ चेंडूंवर १४ धावा ठोकल्या आहेत. संघाची अवस्था ३ बाद ६५ असताना तिलक आणि हार्दिक ही जोडी मैदानात होती. सूर्यकुमार नुकताच बाद झाला होता. त्यामुळे तिलक वर्माने पुढील ३ चेंडू खेळून काढले. पण, त्यानंतर त्याने अक्षरला एक षटकार आणि एक चौकार लगावला. त्यामुळेच दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने अक्षरला गोलंदाजीपासून हटवलं. (IPL 2024 Hardik Pandya)

आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्दिकला जर तिलकने फटकेबाजी करावी असं वाटत असतं तर तो दुसऱ्या बाजूला असताना त्यानेच थेट तिलकला आक्रमक खेळण्याचा सल्ला का नाही दिला, हा प्रश्न उरतोय. दुसरीकडे, हार्दिकच्या (Hardik Pandya) दोन षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी तब्बल ४१ धावा कुटल्या आणि हार्दिकने फॉर्मात असलेल्या टीम डेव्हीलाही सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. या गोष्टी कितपत योग्य होत्या, असा सवालही आता विचारला जातोय. मुंबई इंडियन्सचा संघ आता ९ सामन्यांत ६ पराभवांनंतर नवव्या स्थानावर आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.