IPL 2024 Shahbaz Khan : रिंकू सिंग नंतर शाहबाझ अहमदलाही मिळाली विराटकडून बॅट

IPL 2024 Shahbaz Khan : हैद्राबादचा अष्टपैलू खेळाडू शाहबाझने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपली ही अनमोल भेट लोकांसमोर आणली आहे. 

80
IPL 2024 Shahbaz Khan : रिंकू सिंग नंतर शाहबाझ अहमदलाही मिळाली विराटकडून बॅट
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमुळे (IPL) खेळाडू कसे एकत्र आले आहेत आणि त्यांच्यातील संबंध कसे खेळीमेळीचे आणि देवाण घेवाणीचे झाले आहेत याचा प्रत्यय देणारी एक इन्स्टाग्राम पोस्ट सनरायझर्स हैद्राबादचा युवा अष्टपैलू खेळाडू शाहबाझ अहमदच्या एका पोस्टमुळे आला. शाहबाझला चक्क त्याचा आदर्श असलेल्या स्टार खेळाडू विराटकडून एक बॅट मिळाली आहे. आणि त्यावर विराटने स्वाक्षरीही केली आहे. (IPL 2024 Shahbaz Khan)

या भेटीमुळे खुश झालेल्या शाहबाझने लगेच इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. यात त्याने विराट कोहली अशी अक्षरं असलेली बॅट कॅमेरासमोर धरली आहे आणि मथळा आहे, ‘मिल गयी!’ सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान ही भेट शाहभाझला मिळाली. (IPL 2024 Shahbaz Khan)

New Project 2024 04 29T135514.379

(हेही वाचा –  IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सच्या शतकानंतर विराटच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तेव्हा…)

‘तो’ व्हिडिओही झाला होता व्हायरल

यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगलाही असाच अनुभव आला होता. विराटने आधी भेट म्हणून दिलेली बॅट रिंकूकडून तुटली होती. त्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यादरम्यान रिंकूने विराटकडे नवीन बॅटसाठी विनंती केली. हा व्हिडिओही तेव्हा व्हायरल झाला होता. कोलकाता संघाने त्या सामन्यात बंगळुरूचा एका धावेनं पराभव केला होता. सामन्यानंतर रिंकूने विराटकडे नवीन बॅट मागितली. (IPL 2024 Shahbaz Khan)

आपली पहिली बॅट फिरकीपटूला मोठा फटका खेळताना तुटली, असं तो विराटला सांगताना दिसतो. पण, नंतर दुसऱ्या एका व्हिडिओत रिंकू नवीन बॅट एका चाहत्याला दाखवतो आणि त्याला म्हणताना दिसतो की, ‘त्याला किंग कोहलीकडून नवीन बॅट मिळाली आहे.’ (IPL 2024 Shahbaz Khan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.