Rafael Nadal : माद्रिद ओपनमध्ये नदालची दिमाखदार सुरुवात

Rafael Nadal : दुखापतीतून परतलेल्या नदालने ॲलेक्स दी मिनोरचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

49
Rafael Nadal : माद्रिद ओपनमध्ये नदालची दिमाखदार सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

तंदुरुस्त असलेला राफेल नदाल (Rafael Nadal) काय करिश्मा दाखवू शकतो हे माद्रिद ओपनमध्ये पुन्हा एकदा दिसलं. ॲलेक्स दी मिनॉर विरुद्धचा सामना नदालने ७-६ आणि ६-३ असा सरळ सेटमध्ये जिंकला. नदालचा हा पुनरागमनाचा सामना पाहण्यासाठी स्पेनचे राजा सहावे फिलीप, झिनेदिन झिदान आणि व्हिनिशिअर ज्युनिअर कोर्टवर हजर होते. नदालने सामना जिंकल्यावर आनंदाने या तिघांकडे बघून मानवंदना दिली. (Rafael Nadal)

पण, त्याचबरोबर त्याला दुखापतीचं भानही होतं. ‘सामन्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्त व्हायला अजून वेळ आहे,’ असं त्याने नम्रपणे नमूद केलं. ‘दोन तासांचा सामना खेळणं हे अजूनही माझ्यासाठी कठीण आहे. मी प्रत्येक सामन्यात माझं शरीर कसं साथ देतं, एवढंच सध्या बघतो आहे. संपूर्ण तंदुरुस्तीला अजून वेळ आहे,’ असं तो म्हणाला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Dombivli: भार तपासणी कामाकरिता माणकोली पूल २ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद)

‘या’ खेळाडूंनी आगेकूच ठेवली सुरु

आता नदालचा (Rafael Nadal) पुढील सामना पेड्रो काशिनशी होणार आहे. तर स्पर्धेत स्टेफनोस तेसिटसिपासलाही अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. पात्रता फेरीतून आलेल्या थिएगो मोंटेरोने त्याचा पराभव केला. तर अव्वल सिडेड यानिक सिनरने मात्र आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. डॅनिअल मेदवेदेवनेही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. (Rafael Nadal)

महिलांमध्ये गतविजेत्या इगा स्वियातेकने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर २०२२ ची विजेती ऑन्स जेबर आणि कोको गॉफ या सिडेड खेळाडूंनीही आगेकूच सुरू ठेवली आहे. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.