Dombivli: भार तपासणी कामाकरिता माणकोली पूल २ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

जड, अवजड वाहनेही या रस्त्यावरून आता धावू लागल्याने रेतीबंदर रेल्वे फाटकात कोंडी होऊ लागली आहे.

89
Dombivli: भार तपासणी कामाकरिता माणकोली पूल २ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

नव्याने बांधण्यात आलेला मोठागाव येथील माणकोली उड्डाणपुलाच्या वजन भार तपासणीच्या कामासाठी सोमवार, (२९ एप्रिल) ते गुरुवार, (२ मे) असे चार दिवस बंद राहील. परिणामी कोणालाही या मार्गाने वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे ‘काम चालू पूल बंद’, असे फलक एमएमआरडीएने डोंबिवलीत लावले आहेत. ठाण्याला जाणारा जवळचा मार्ग बंद झाल्याने लोकं नाराजी व्यक्त करीत आहेत. (Dombivli)

मुंबई, ठाणे प्रवास जलदगतीने आणि जवळचा व्हावा तसेच डोंबिवलीकरांना कमी वेळ व वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, या उद्देशाने या माणकोली उड्डाणपुलाची निर्मिती झाली. मोठागाव माणकोली उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षीच पूर्ण झाले होते. या पुलाच्या भिवंडी बाजूकडील पूल ते मुंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. डोंबिवली बाजूकडील पुलाचा उतार ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्याचे कामही सुरू आहे. खाडीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने आणि डोंबिवलीतील प्रवासी वाहनाने अर्ध्या तासात ठाणे, तर एक तासात मुंबईला आरामात पोहचत असल्याने प्रवासी माणकोली पुलाचा जाण्या-येण्यासाठी अग्रक्रमाने वापर करीत आहेत.

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीची वॉर्नर आणि शिखर धवनच्या विक्रमांशी बरोबरी )

पुलावरून वाहतूक करू नये
या पुलाचे उदघाटन आद्यप झाले नाही. तरीही पुलावरील दोन्ही बाजूंचे अडथळे दूर करून वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. काही वेळा पुलाच्या सुरक्षा रक्षकला दमदाटी करून पुलाचे अडथळे बाजुला करूनही लोकं वाहतूक करीत असतात; परंतु वाहतुकीसाठी हा पूल योग्य आहे, उदघाटन झाले अशा प्रकारची प्रक्रिया होत नाही तो पर्याय या पुलाबाबत कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी एमएमआरडीए घेणार नाही. परिणामी पूल अधिकृतपणे सुरू झालेला नाही त्यामुळे पुलावरून वाहतूक करू नये, असेही फलक गेल्या वर्षीच या रस्त्यावर लावले आहेत.

माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद
डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना शिळफाटा रस्त्यावरील, दुर्गाडी भिवंडी कोन रस्त्यावरील कोंडीतून मुक्तता मिळत असल्याने प्रवासी माणकोली पुलाला अलीकडे सर्वाधिक पसंती देत आहेत. जड, अवजड वाहनेही या रस्त्यावरून आता धावू लागल्याने रेतीबंदर रेल्वे फाटकात कोंडी होऊ लागली आहे. या पुलावरील वाहन भार वाढू लागल्याने एमएमआरडीएने या पुलावरील वाहन भार तपासणीचे काम हाती घेतले परिणामी सोमवार ते गुरुवारपर्यंत माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शनिवारी या रस्त्यावर पूल बंदचे फलक लावले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.