मुंबईतील सर्व रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याची CM Eknath Shinde यांची ग्वाही

मुख्यमंत्री म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी धनुष्यबाणाला मत दिले होते, २०१९ ला देखील धनुष्यबाण होते आणि आता २०२४ ला ही धनुष्यबाणाच आहे. म्हणून खरी शिवसेना ही धनुष्यबाणाची शिवसेना आहे.

114
मुंबईतील सर्व रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याची CM Eknath Shinde यांची ग्वाही

महायुतीचे सरकार आल्यापासून मुंबईच्या विकासाला गती प्राप्त झाली असून येत्या काळात मुंबईत रखडलेले सर्व पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हे सरकारी निर्णय आवश्यक असतील ते घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प मार्गी लावून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करू असेही ते म्हणाले. मुंबईच्या बाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ही आश्वासन यावेळी त्यांनी दिले. (CM Eknath Shinde)

“फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार राहुल शेवाळे खासदार” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चेंबूर परिसरातील घाटला येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचार सभेत विश्वास व्यक्त केला. राहुल शेवाळे यांच्या दहा वर्षातील कामांचे कौतुक करत, देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि मोदींना पुन्हा साथ देण्यासाठी दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांनाच विजयी करा, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, २०१४ पासून महायुती सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची प्रशंसा करत भारत आता मजबूर नसून मजबूत आहे. ही निवडणूक देशाच्या भविष्याची देशाच्या विकासाची आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महत्त्वाची असून त्यासाठी दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना विजयी करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी धनुष्यबाणाला मत दिले होते, २०१९ ला देखील धनुष्यबाण होते आणि आता २०२४ ला ही धनुष्यबाणाच आहे. म्हणून खरी शिवसेना ही धनुष्यबाणाची शिवसेना आहे. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणात धारावी पुनर्विकास बीडीडी पुनर्विकास यांसह दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच पुन्हा एकदा आपला आशीर्वाद मिळावा यासाठी जनतेला आवाहन केले. (CM Eknath Shinde)

आपण यांना पाहिलंत का – मुख्यमंत्री

गेल्या दहा वर्षात राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासाचे काम केले असून आता त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांना जनतेने फारसे पाहिलेले देखील नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण यांना पाहिलेत का? असा प्रश्न जनतेला विचारला. तसेच विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मतदानाच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य बजावावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.