Share Market: निवडणुकीच्या धामधुमीतही शेअर बाजारात तेजी, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ? जाणून घ्या

114
Share Market: शेअर बाजार धडाधड कोसळला; अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले, जाणून घ्या
Share Market: शेअर बाजार धडाधड कोसळला; अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले, जाणून घ्या

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकारात्मक तेजी दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजारही वधारला आहे. दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात राहिले. सेन्सेक्स ०.५० टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी ०.२८ टक्क्यांनी वधारला. सोमवार, (२९ एप्रिल) आणि मंगळवार, (३० एप्रिल हे या महिन्यातील आणखी दोन दिवस ट्रेडिंगचे आहेत.

सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांच्या समभागात २.११ ते १.७७ टक्क्यांनी वाढ झाली, तर दुसरीकडे अपोलो हॉस्पिटल्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाइफ आणि बजाज ऑटो यांचे समभाग ७.६९ ते १.३७ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे सेन्सेक्सच्या ३० पैकी २४ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर ६ शेअर्स लाल रंगात व्यापार करत होते. निफ्टीमधील २९ शेअर्स हिरव्या रंगात, तर २१ शेअर्स लाल रंगात होते.

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)

कोणते शेअर्स वाढले?
एप्रिल महिन्यातील तेजीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निफ्टी आयटी इंडेक्स वगळता सर्व Sectaral Indicies सुद्धा तेजीत होते. Nifty PSE, Nifty CPSE, NIfty Realty, Nifty PSU Rank या निर्देशांकांनी बाजार वाढवण्यास हातभार लावला. इंडेक्समधील एकूण 15 पैकी तब्बल ११ कंपन्यांचे शेअर्सनी एका वर्षांत गुंतवणूकदारांना १५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.