Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याची निवडणूक भाजपाच्या गडात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे त्याची बरोबरी सध्या कुणीच करू शकत नाही.

107
Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या मैदानात भाजपा उमेदवारांनी कसली कंबर

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या भागात निवडणूक होणे आहे त्या भागाला भाजपाचा गड म्हणतात. २०१९ च्या निवडणुकीत या भागात भाजपा आणि रालोआच्या घटक पक्षांना चांगले यश मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान विरोधकांनी भाजपाला दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून १९१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. निवडणूक आता तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. ७ मे रोजी १० राज्यातील ९४ जागासाठी ज्या भागात मतदान होणे आहे ती भाजपाची सुपिक जमीन होय. (Lok Sabha Election 2024)

लोकसभेची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहे आणि निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. या टप्प्यात आसाम (०४), बिहार (०५), छत्तीसगड (०७), मध्य प्रदेश (०९), महाराष्ट्र (११), दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव (२) गोवा (२), कर्नाटक (१४), जम्मू आणि काश्मीर (१), पश्चिम बंगाल (०४), गुजरात (२५) आणि उत्तर प्रदेश (१०) जागांवर मतदान होणार आहे. मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसप उमेदवाराचे निधन झाल्यानंतर आयोगाने निवडणूक रद्द करण्याची घोषणा केली आहे. (Lok Sabha Election 2024)

२०१९ मधील निवडणूक निकाल बघितला तर, आता पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान झाले त्यातील रालोआने ४९ जागांवर विजय मिळवला होता. तर, विरोधकांच्या खात्यात ४५ जागा गेल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील ८८ जागांपैकी एनडीएला ५८ जागांवर यश मिळाले. एकट्या भाजपाने ५० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस २१ जागांवर तर इतर विरोधी पक्षांना ९ जागांवर यश मिळाले. तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर मतदान होणे आहे. प्रचाराने जोर धरला आहे. राजकीय वातावरणाने उच्चांक गाठला आहे. २०१९ च्या निवडणुकीत यातील बहुतांश जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. गुजरातच्या सर्व २५ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१९ मध्ये गुजरातमधील सर्व जागा भाजपाने जिंकल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)

याशिवाय, मध्य प्रदेशातील सर्व ०८, बिहारमधील ०५ आणि छत्तीसगडमधील ७ पैकी ६ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. कोरबा येथूनच काँग्रेसला यश मिळाले. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ज्या ११ जागांवर निवडणूक होत आहे त्या सर्व जागांवर २०१९ मध्ये भाजपाचा विजय झाला होता. मात्र, आता महाराष्ट्रातील ११ आणि कर्नाटकातील १४ ज्या जागांवर मतदान होणे आहे तेथे कॉंग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आघाडीने भाजपापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. उत्तर प्रदेशातील ज्या १० जागांवर मतदान होणार आहे त्यातील संभल आणि मैनपुरीच्या जागा समाजवादी पक्षाला मिळाली होती. उर्वरित ८ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. अशात, विरोधक भाजपाकडून किती जागा हिसकाविण्यात यशस्वी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)

तिसऱ्या टप्प्यात सर्व मोठे उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून उमेदवारी दाखल केली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी १ मे रोजी अमेठीला भेट देणार असून ते सुध्दा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. प्रियंका गांधी २ मे रोजी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौमधून उमेदवार असतील. अमेठीतून स्मृती इराणी आणि सुलतानपूरमधून मनेका गांधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बनारसमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

मात्र, काँग्रेसने अद्यापही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केलेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस याबाबत घोषणा करेल, असे मानले जात आहे. यासोबतच रायबरेली आणि कैसरगंजच्या बृजभूषण शरण सिंह या बहुप्रतिक्षित जागेसाठीही भाजप आपला उमेदवार जाहीर करणार आहे. (Lok Sabha Election 2024)

आत्तापर्यंत पंतप्रधान हे सर्वात मोठे सेनानी

महत्वाचा मुद्या असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे त्याची बरोबरी सध्या कुणीच करू शकत नाही. पंतप्रधान दररोज सरासरी तीन ते चार सार्वजनिक सभा किंवा रोड शो घेत आहेत. गेल्या पाच दिवसांत त्यांनी सुमारे २५ जाहीर सभा घेतल्या. दर तिसऱ्या दिवशी पंतप्रधान कोणत्या ना कोणत्या विधानाने विरोधकांवर हल्लाबोल करतात. अलीकडेच त्यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथून समान मालमत्ता वाटपाच्या काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनाला मंगळसूत्राशी जोडून मोठा मुद्दा बनवला. (Lok Sabha Election 2024)

यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याला मुस्लीम लीगशी जोडून राजकीय संकल्पना बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधकांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा टोमणाही चर्चेचा विषय ठरला की पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचा मंगळसूत्राशी काय संबंध? काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या प्रत्यूत्तराने मात्र बाजी पलटविली. ‘माझ्या आईने आपले मंगळसूत्र देशासाठी अर्पण केले’, असे त्या म्हणाल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.