Muslim : वासनांध रहीम खानकडून विवाहित हिंदु महिलेला लग्नासाठी ब्लॅकमेल 

92

मध्य प्रदेशात रहीम खान नावाच्या मुसलमान (Muslim) व्यक्तीने एका विवाहित हिंदु महिलेला ब्लॅकमेल करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. रहिम खानने विवाहित महिलेवर पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणला. रहीम खान तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही दबाव आणत होता, असे पीडित महिलेने सांगितले.

महिलेचे फोटो सोशल मीडियात केले व्हायरल 

पीडित महिलेने सांगितले की, तिच्या लहान बहिणीच्या वाढदिवसाला तिच्या आईच्या ओळखीचा रहीम खान तिच्या घरी आला होता. घरात रहीमने तिचा मोबाईल उचलला आणि त्यातील तिच्या आईचे छायाचित्र त्याने स्वत:च्या भ्रमणभाषवर पाठवले. त्यानंतर त्याने ते छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून त्यामध्ये अश्‍लील गोष्टी लिहिल्या. त्यानंतर तो पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. तो तिच्यावर पतीला सोडून त्याची पत्नी होण्यासाठी दबाव आणू लागला. इस्लाममध्ये (Muslim) चार लग्नांना अनुमती आहे, असे सांगून तो तिच्यावर तिच्या लहान बहिणीचे धर्मांतर करण्यासाठीही धमकावू लागला. या प्रकरणी आरोपी रहीम खानला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

(हेही वाचा #No Bindi No Business गेल्या वर्षीच्या ट्रेंडचा यंदाच्या दिवाळीत परिणाम; जाहिरातींमध्ये दिसल्या कुंक लावलेल्या Model)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.