#No Bindi No Business गेल्या वर्षीच्या ट्रेंडचा यंदाच्या दिवाळीत परिणाम; जाहिरातींमध्ये दिसल्या कुंक लावलेल्या Model

93

गेल्या वर्षी सोन्याचे दागिने विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी दिवाळीच्या वेळी जाहिराती केल्या होत्या, मात्र त्यामध्ये कुंक न लावलेल्या Model दाखवल्या होत्या, ज्यामुळे सोशल मीडियामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातून धडा घेऊन यंदाच्या दिवाळीत या कंपन्यांनी या सुधारणा करून कुंकू लावलेले model दिसत आहेूत.

मागच्या वर्षी हिंदूंच्या सणानिमित्त दागिन्यांच्या जाहिराती दाखवताना त्यात हिंदु संस्कृतीप्रमाणे कुंकू न लावलेले Model दाखवण्यात आले होते. यामध्ये तनिष्क, मलबार गोल्ड, पु.ना. गाडगीळ. पी.सी. चंद्रा आदी दागिने व्यापार्‍यांचा समावेश होता.

आर्थिक फटका बसल्याच्या भीतीने सुधारणा

मागील वर्षीपर्यंत या दागिने व्यापार्‍यांनी हिंदूंच्या सणांनिमित्त जाहिराती करताना वरील हिंदू धर्मविरोधी कृत्य केले होते. त्यावर प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी सामाजिक माध्यमांवरून ‘#NoBindiNoBusiness’ असे आवाहन केले होते, म्हणजेच ज्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीतील महिलांच्या कपाळावर टिकली/कुंकू दाखवणार नाहीत, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. ‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने वर्ष २०२२ च्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातीत महिलांच्या कपाळावर कुंकू दाखवले नव्हते. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही ‘#NoBindi_NoBusiness’ आणि ‘#Boycott_MalabarGold’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने जाहिरात मागे घेतली होती. हिंदूंनी वेळीच केलेल्या विरोध केल्यामुळे आर्थिक फटका बसल्याच्या भीतीने या वर्षीच्या दिवाळीच्या अनेक जाहिरातीत महिलांना दागिने, तसेच कपाळावर कुंकू यांच्यासह दाखवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.