Maharashtra Politics : कार्यकर्ते करतात शिमगा; मात्र नेत्यांची कौटुंबिक दिवाळी

पक्षाच्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच एकमेकांच्या विरोधात शिमगा करताना दिसून येतात. मात्र याचवेळी नेत्यांचे म्हणाल तर कौटुंबिक दिवाळी साजरी करण्यात नेते मंडळी व्यस्त आहेत.

85
Maharashtra Politics : कार्यकर्ते करतात शिमगा; मात्र नेत्यांची कौटुंबिक दिवाळी
Maharashtra Politics : कार्यकर्ते करतात शिमगा; मात्र नेत्यांची कौटुंबिक दिवाळी

महाराष्ट्रातील राजकारणात केव्हा काय घडेल याचा काही नेम नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे दोन वेगवेगळे गट पडले. दोन्हीपैकी एक एक गट सत्तेत सामील झाला. त्यामुळे दोन्ही पक्षाचे वेगवेगळे गट एकमेकांसमोर उभे ठाकले. पक्षाच्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच एकमेकांच्या विरोधात शिमगा करताना दिसून येतात. मात्र याचवेळी नेत्यांचे म्हणाल तर कौटुंबिक दिवाळी साजरी करण्यात नेते मंडळी व्यस्त आहेत. (Maharashtra Politics)

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटी मधील फरक काय?

वर्षभरापेक्षा अधिकचा काळ लोटला शिवसेनेच्या फुटीला. तरीदेखील आजही शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट या दोन्हींचे शिवसैनिक हे एकमेकांसमोर डोकी फोडण्यासाठी नेहमीच तयार असतात असे चित्र समोर आले. त्यासाठी दिवाळीचा सण देखील यामधून सुटला नाही. ठाण्यातील मुंब्रा भागातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयावरून हा वाद सुरू झाला आणि त्यामध्ये दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांसमोर आले होते. रोज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे या वादामध्ये तेल टाकतच असतात आणि त्यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक देखील त्यांच्यावर तेवढ्याच आक्रमकतेने तोंड सुख घेताना दिसून येतात. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक मात्र जितेंद्र आव्हाड हेच अजित पवार गटाच्या विरोधात विधान करताना दिसून येतात. मात्र इतर पदाधिकारी हे एकमेकांबरोबर भेटीगाठी घेऊन आपापसात खेळीमेळीच्या वातावरणात दिसून येतात व पक्ष फुटला नसल्याचे देखील सांगायला कमी करत नाही. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Ramdas Kadam : अजित पवार काहीही करू शकतात; असे का म्हणाले रामदास कदम?)

ज्याप्रमाणे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत आणि रस्त्यावरती लढाई लढताना दिसतात तसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडताना दिसत नाही. काही अंशी राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडतात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजही हयात असल्याने पवार कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने का होईना एकत्र आलेले दिसून येते. राजकारणात तसे पाहता कोणीही कोणाचा फार काळ शत्रू किंवा फार काळ मित्र नसतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी भिडताना दिसून येतात तर दुसरीकडे नेते मात्र कौटुंबिक संवाद आणि एकमेकांशी जवळी साधूनच असतात हे मात्र तितकच खरं आहे. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.