Ramdas Kadam : अजित पवार काहीही करू शकतात; असे का म्हणाले रामदास कदम?

71

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तेतील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, अजित पवार काय करतात ते समजत नाही. एकाचवेळी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शरद पवार यांना भेटले तर समजू शकतो. काय चाललं ते समजत नाही. कधी कधी अजित पवार यांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार मुख्यमंत्री यांच्याविरोधात आंदोलन करतात. मला हे काही समजत नाही. जेव्हा मराठा समाज अंगावर आला, तेव्हा डेंग्यू झाला. दादा काहीही करू शकतात. दादा दादा आहेत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार उर्फ दादांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावरती त्यांच्यासोबत राजकारणात असलेल्या लोकांना देखील त्यांच्या राजकारणाचा स्थान पत्ता लागत नसतो. त्यामुळेच की काय सत्तेत सोबत असलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी देखील अजितदादांच्या राजकारणावरती भरोसा नसल्याचे दर्शवले आहे. सरकार अडचणीत येते त्यावेळेस बरोबर यांना डेंग्यू होतो आणि ते स्वतःला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अलिप्त ठेवतात तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्रालयात आंदोलने करतात. हा मोठा विरोधाभास त्यांच्या कृतीतून दिसून येतो.

…नाही तर रडायची वेळ येईल – सूरज चव्हाण

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam)  यांच्या टीकेला अजित पवार गटाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवारांवर बोलवं आपण इतके मोठे नेते नाही. अजित पवार आपल्या आकलना बाहेरचे नेते असल्याचं लक्षात ठेवा असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिला आहे. पवार एकत्रित भेटण्याच्या प्रश्नावर, पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक जपण्याचं काम केलं आहे. सुखदुःखात सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे. त्याला राजकीय रंग देण्याचं काम आपल्यासारखा ज्येष्ठ नेत्याकडून होत आहे हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. पवार कुटुंब आणि अजित पवार आपल्या अकलना बाहेरचा विषय आहे, आपलं जेवढं आकलन आहे तेवढेच वक्तव्य करावं नाहीतर डोळ्याला झंडू बाम लावून रडण्याची वेळ येते, असा सल्ला देखील चव्हाण यांनी कदम यांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.