BEST Strike : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

135
BEST Strike : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

आज म्हणजेच शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मुंबईची ‘बेस्ट’ (Best Strike) बस वाहतूक विस्कळीत झाली असून सलग तिसऱ्या दिवशी कंत्राटी कर्मचारी यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बेस्ट कर्मचारी संपावर

पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप (Best Strike) पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे.

(हेही वाचा –  Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक)

… तोपर्यंत हा संप सुरुच राहणार

पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी (Best Strike) मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.