Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

97
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

समृद्धी महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) मालिका सुरूच आहे. कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी काम सुरु असतांना होणाऱ्या गडबडीमुळे तिथे सतत अपघात होतांना दिसतात. अशातच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg) केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. शुक्रवार ४ ऑगस्टच्या मध्यरात्री हा अपघात घडला.

ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकचा टायर फुटून भीषण आग लागली.

(हेही वाचा – Amrut Udyan : अमृत उद्यान 16 ऑगस्टपासून नागरिकांसाठी होणार खुले)

नेमका प्रकार काय?

समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक धानोरा राजनी गावाजवळ मध्यरात्री एका ट्रकने पेट घेतला. नाशिकहून नागपूर येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा सुरुवातीला टायर फुटला आणि त्यानंतर हा ट्रक साईड बॅरियरला धडकला. त्यानंतर या ट्रकला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या चार बंबांना देखील ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. केमिकल असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ही आग आटोक्यात येत नव्हती. सुदैवाने चालक आणि वाहक सुखरूप बचावले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.