Bangalore Blast : कॅफेमध्ये झालेला स्फोट हा घातपातच; बॅग ठेवताना सीसीटीव्हीत दिसला आरोपी

या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

212
Bangalore Blast : कॅफेमध्ये झालेला स्फोट हा घातपातच; सीसीटीव्हीत बॅग ठेवताना दिसला आरोपी

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरातील कॅफेमध्ये शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी झालेला स्फोट (Bangalore Blast) आईडी ब्लास्ट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक रामेश्वरम कॅफेत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ९ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी)

५ जणांची प्रकृती गंभीर 

बेंगळुरू शहरातील राजाजीनगर येथील कॅफेच्या (Bangalore Blast) व्हाईटफिल्ड शाखेत शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य सुरू केले. या घटनेच्या प्राथमिक तपासात पोलिसांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज तापासून पाहिले असता यात एक संशयास्पद इसम कॅफेच्या कॅश काऊंटर जवळ बॅग ठेवताना आढळून आला. या बॅगमध्ये लपवून ठेवलेल्या आईडीचा स्फोट झाला. ज्यात ९ जण जखमी झाले. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून एक महिला ४० टक्के भाजली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्टता 

दरम्यान या स्फोटानंतर कर्नाटकचे (Bangalore Blast) मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी हा स्फोट आईडी ब्लास्ट असल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी एक इसम कॅफेच्या कॅश काऊंटरवर स्फोटकांची बॅग ठेवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर वेळापत्रक)

कॅफेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

दुपारी १ वाजेच्या सुमारास हा स्फोट (Bangalore Blast) झाला. यामध्ये कॅफेचे (Rameshwaram Cafe) मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरात नाकाबंदी 

या घटनेनंतर शहरात नाकाबंदी (Bangalore Blast) करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Bangalore Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.