Mithi River : मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या आणखी ६७२ बांधकामांवर कारवाई

मिठी नदीचा ५०० मीटर परिसर झाला मोकळा

1372
Mithi River : मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या आणखी ६७२ बांधकामांवर कारवाई
Mithi River : मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या आणखी ६७२ बांधकामांवर कारवाई

मिठी नदीच्या (Mithi River) रुंदीकरणात मागील अनेक वर्षांपासून अडथळा ६७२ झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions) हटवण्याची धडक कारवाई गुरुवारी २९ फेब्रुवारी आणि शुक्रवारी ०१ मार्च २०२४ दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) ‘एच पूर्व’ विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटरवर नेण्यास मदत होणार आहे.

New Project 2024 03 01T203443.497

मिठी नदीत सांडपाण्याचा प्रवाह 

मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (एच पूर्व) स्वप्नजा क्षीरसागर यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. मिठी नदीतील (Mithi River) सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये (Mithi River) उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी काम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

New Project 2024 03 01T203338.082

(हेही वाचा- Narendra Modi: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला शत्रू नंबर-१ मानतात, पंतप्रधान मोदींनी लगावला टोला)

मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा 

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) वतीने वेळोवेळी कारवाई करण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये बक्षी सिंग कंपाऊंड येथील १०० मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  याच धर्तीवर  मिठी नदीच्या (Mithi River) पात्रात किंवा पात्रालगत अनधिकृतपणे झालेली बांधकामे (Unauthorized constructions) निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या वतीने २९ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२४ दरम्यान धडक मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत ६७२ झोपड्या तसेच अन्य बांधकामांवर (Unauthorized constructions) तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा (Mithi River) सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला.

New Project 2024 03 01T203024.994

 

मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल

आता या संपूर्ण परिसरामध्ये मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये (Mithi River) उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहे. यामुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल. तसेच मिठी नदीमध्ये (Mithi River) उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल.

New Project 2024 03 01T202754.610

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.