Narendra Modi: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला शत्रू नंबर-१ मानतात, पंतप्रधान मोदींनी लगावला टोला

158
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट

हुगळी येथील आरामबागमध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) २ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी १ मार्चला दुपारी पश्चिम बंगालला ते पोहोचले. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला नंबर -१ शत्रू मानतात. संदेशखालीच्या आरोपींना वाचवणारे कोणीतरी असावे, त्यांना लाज वाटली पाहिजे, असा टोला पंतप्रधानांनी ममतांना यावेळी लागवला आहे.

यावेळी झालेल्या भाषणात मोदी म्हणाले की, येथील मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी आंदोलनाला बसतात. केंद्राच्या योजनांमध्ये त्यांना खुलेआम लुटण्याची संधी मिळावी, अशी येथील सरकारची इच्छा आहे. मोदी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार चालू देत नाहीत. त्यामुळे त्या मोदींना शत्रू क्रमांक -१ मानतात. मी तुम्हाला विचारतो मी टीएमसीची लूट चालू ठेवू द्यावी का? टीएमसी काय करत आहे, मी त्याला परवानगी द्यावी? हे पैसे तुमचे आहेत की नाही? बंगालच्या लोकांनो, हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे की नाही? मी ते इतरांना लुटू द्यावे का? मी लढलो तर बरोबर करतो का? याशिवाय इतरही काही मुद्दे मोदींना यावेळी केलेल्या भाषणात मांडले आहेत.

तसेच यावेळी त्यांनी यावेळी ते म्हणाले की, बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC)नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. लोकांचा दावा आहे की, शहाजहानने लोकांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपी शेख शहाजहानला ५५ दिवसांनी अटक केली.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : विरोधकांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही ; मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका)

माता-भगिनींच्या सन्मानासाठी भाजपचे नेते लढले
आमच्या नेत्यांना लाठीचार्ज आणि त्रास सहन करावा लागला. मग काल बंगाल पोलिसांना तुमच्या शक्तीपुढे झुकावे लागले आणि त्या आरोपीला (Sheikh Shah Jahan) अटक करावी लागली. सुमारे दोन महिने तो फरार होता. त्याला वाचवणारा कोणीतरी असावा. अशा टीएमसीला माफ कराल का? येथील माता-भगिनींचे जे काही झाले त्याचा बदला आम्ही घेऊ. प्रत्येक जखमेला मतदानाने उत्तर द्यावे लागते. आज बंगालची जनता मुख्यमंत्री दीदींना विचारत आहे की, संदेशखालीच्या बळींपेक्षा काही लोकांची मते तुमच्यासाठी जास्त झाली आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

गरीब, शेतकरी, महिला, तरुण हे आमचे प्राधान्य आहेत
१० वर्षात भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २१व्या शतकातील भारत वेगाने प्रगती करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येय आम्ही एकत्र ठेवले आहे. देशातील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण… ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही सातत्याने गरिबांच्या कल्याणासाठी पावले उचलली आहेत, ज्याकडे जग पाहत आहे.

पर्यावरणामुळे विकास शक्य आहे हे जगाला दाखवून दिले
पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे आधुनिकीकरण ज्या गतीने देशाच्या इतर भागात होत आहे त्याच गतीने व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाशी एकरूप होऊन विकास कसा होऊ शकतो हे भारताने जगाला दाखवून दिले. हल्दिया ते बरौनी ही ५००किमी पेक्षा जास्त लांबीची कच्च्या तेलाची पाइपलाइन याचे उदाहरण आहे. पश्चिम बंगालमधील जनतेच्या सहकार्याने आम्ही विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.