Water Cut : मुंबईची संभाव्य पाणी कपात टळली

राज्य शासनाच्या हमीमुळे संभाव्य पाणी कपात न करण्याचा घेतला निर्णय

766
Pune: पुण्यातील कोंढवा, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद
Pune: पुण्यातील कोंढवा, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर (water cut) परिणाम होऊ नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या साठ्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महानगरपालिकेने ( municipal corporation) केली होती. मुंबईच्या (mumbai) पाण्याचा तुटवडा निभावणी साठ्यातून उपलब्ध करून देण्याची हमी आता राज्य सरकारने दिली आहे.  सरकारकडून हमी मिळालया पाणी पुरवठ्यातील (water cut) प्रस्तावित १० टक्के कपात करण्यात येणार नाही, असे महानगरपालिका ( municipal corporation) प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी (water cut) कपात जाहीर करण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला होता, परंतु तो जाहीर केला नव्हता.

(हेही वाचा- Legislative Council: विधान परिषदेच्या कामकाजाचे सूप वाजले, विधीमंडळाच्या ५ बैठकांत दररोज सरासरी ५ तास ४२ मिनिटांचे कामकाज, ३१ मिनिटांचा वेळ वाया)

 दहा टक्के कपातीचा निर्णय घेतला होता प्रशासकीय स्तरावर

यापूर्वीच्या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय होता. मात्र यंदाच्या पावसाळ्यात ऑक्टोबर २०२३ मध्ये पाऊस झाला नव्हता. त्यामुळे गेल्या वेळीच्या तुलनेत सद्यस्थितीला धरण साठ्यामध्ये ५.५८ टक्के पाणी साठा (water cut) कमी आहे. शुक्रवारी १ मार्च २०२४ रोजी मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा (water cut) करणाऱ्या तलावांमध्ये एकूण साठ्याच्या ४२.६७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्याबाबतचा अंदाज पाहता तसेच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता पाहता १० टक्के पाणी कपातीचा (water cut) निर्णय महानगरपालिकेमार्फत ( municipal corporation) घेण्यात आला होता. मात्र, घोषित करण्यात आला नव्हता. मात्र, राज्य शासनाकडून मिळालेल्या हमीमुळेच कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे जलअभियंता विभागाने जाहीर केले आहे. (water cut)

 सध्याची १५ टक्के पाणीकपात ५ मार्चपर्यंतच

मात्र,कपात केली जाणार नसली तरी मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिका ( municipal corporation) प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले. दरम्यान पिसे येथील पंपिंग स्टेशनमधील विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने २० पैकी १५ पंप सुरु झाले असून एक ट्रान्सफार्मर बसवण्याची प्रक्रिया ५ मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत सध्या १५ टक्के पाणीकपात (water cut) जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही पाणी कपात तांत्रिक असून ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण झाल्यानंतरही ही कपातही मागे घेऊन मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल,असेही जलअभियंता यांनी स्पष्ट केले.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.