GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

540
GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एका जीएसटी अधिकाऱ्याने १६ कथित कंपन्यांच्या मदतीने १७५ कोटी ९३ लाख रुपयांचा जीएसटी परतावा घोटाळा केला आहे. या जीएसटी अधिकाऱ्याने कथित कंपन्यांच्या खात्यावर १७५ .९३ कोटी रुपयांची रक्कम पाठवून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

अमित लाळगे (Gst Officer Amit Lalge ) असे या जीएसटी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमित लाळगे हे विक्रीकर अधिकारी (GST Officer) अमित लाळगे त्यांची तत्कालीन नेमणूक वस्तू व सेवाकर विभाग जीएसटी भवन, माझगाव मुंबई येथे करण्यात आली होती.  त्यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून घाटकोपर विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२१ आणि २०२२ या कालावधीत अमित लाळगे यांच्या विभागात येणाऱ्या १६ कथित करदात्या कपन्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जीएसटी क्रमांक मिळवला होता. या १६ कपन्यांनी शासनाला कुठलाही ‘कर’ (GST) न भरता कर परतावा मिळावा म्हणून कर परताव्याचे ३९ अर्ज सादर केले होते. हा कर परतावा १७५.९३ कोटी मिळावा म्हणून हे अर्ज करण्यात आले होते.

(हेही वाचा – Bangalore Blast : कॅफेमध्ये झालेला स्फोट हा घातपातच; बॅग ठेवताना सीसीटीव्हीत दिसला आरोपी)

करदाते बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम दिसत असतानादेखील जीएसटी अधिकारी अमित लाळगे यांनी नामंजूर न करता आपल्या पदाचा गैरवापर करून कथित करदात्या कंपन्यांशी संगमत करून या कथित कंपन्यांच्या १६ खात्यावर १७५ कोटी,९३ लाख १२हजार ६२२ रुपये कर परतावा म्हणून पाठवून शासनाची फसवणूक केली. हा प्रकार जीएसटी वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात येताच याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली.

चौकशी विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या विभागीय चौकशीत अमित लाळगे यांनी केलेल्या गैरव्यवहार समोर आल्यानंतर अमित लाळगेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.