Ahmednagar: मांजरीचा जीव वाचताना बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात पडून ५ जणांचा मृत्यू

मांजरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता.

191
Ahmednagar: मांजरीचा जीव वाचताना बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात पडून ५ जणांचा मृत्यू

एका मांजरीचा जीव वाचवायला गेलेले ६ जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमनगरमधील (Ahmednagar) नेवासा तालुक्यात ही घटना घडली आहे. येथे २०० फूट खोल खड्डा बायोगॅस प्रकल्पासाठी खोदण्यात आला होता.

नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी एक मांजर बायोगॅसच्या खड्ड्यात पडली होती. मांजरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas Pit) उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता. मांजरीला वाचवताना ही व्यक्ती खड्ड्यात पडली. ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले, मात्र त्याला वाचवण्याच्या नादात आणखी ५ जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले. या ठिकाणी असलेल्या २०० फूट खोल विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.

(हेही पहा – PM Narendra Modi: शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान रामटेक दौऱ्यावर)

माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड, अशी या व्यक्तींचा नावे आहे. यापैकी एका व्यक्तिची ओळख पटलेली नाही. उर्वरित ५ जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तिवर नेवासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने मदतीसाठी खड्ड्यात उतरलेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेल्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.