Monsoon: कसा असेल यंदाचा मान्सून? स्कायमेटने वर्तवला अंदाज

197
Monsoon: कसा असेल यंदाचा मान्सून? स्कायमेटने वर्तवला अंदाज
Monsoon: कसा असेल यंदाचा मान्सून? स्कायमेटने वर्तवला अंदाज

स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, (Monsoon) यंदा समाधानकारक मान्सून (Monsoon) असणार आहे, असे समजते. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरीच्या १०२ टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट वेदरने (Skymet Weather) वर्तवला आहे. (Monsoon)

(हेही वाचा –PM Narendra Modi: शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान रामटेक दौऱ्यावर)

गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा मान्सून समाधानकारक

गेल्या वर्षी २०२३ मध्ये मान्सून (Monsoon) फार चांगला पहायला मिळाला नाही. मात्र, यंदा मान्सून समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सूनचा (Monsoon) पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Monsoon)

(हेही वाचा –Ghanshyamdas Birla : अनेक अडचणींना तोंड देऊन व्यवसायाची जागतिक पातळीवर भरभराट करणारे घनश्यामदास बिर्ला )

यंदाच्या मान्सूनमुळे पाणीटंचाईपासुन दिलासा मिळणार

ल निनोचं (El Nino) ला निनो (La Nina) मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस (Monsoon) झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. (Monsoon)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.