Milind Deora : जे स्वत:च्या इमारतीतील लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते जनतेच्या समस्या काय सोडवणार! देवरांनी घेतला सावंतांचा समाचार

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात जीवाची बाजी लावली आहे.

97
Milind Deora : जे स्वत:च्या इमारतीतील लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते जनतेच्या समस्या काय सोडवणार! देवरांनी घेतला सावंतांचा समाचार

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात जीवाची बाजी लावली आहे. या मतदार संघातून शिवसेना उमेदवार निवडून आणण्यासाठी होणाऱ्या प्रचार सभा आणि रॅलींमध्ये देवरा हे जातीने लक्ष घालत असून प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद सावंत यांचाही समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात त्यांनी सावंत यांचा समाचार घेतानाच ज्या अरविंद सावंत यांना आपल्या इमारतीतील लोकांना न्याय देता येत नाही ते मुंबईतील चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांच्या समस्या काय सोडवणार असा प्रश्न देवरा यांनी व्यक्त केला आहे. (Milind Deora)

मनसेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शिवडीतील राष्ट्रीय मिल मजदूर संघांत पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, मनसे नेते बाळा नांदगावकर, भाजपाचे आमदार व मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष व आमदार राहुल नार्वेकर आदींसह पक्षांचे नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. (Milind Deora)

(हेही वाचा – Arvind Kejriwal : प्रचार हा मूलभूत अधिकार नाही; केजरीवाल यांच्या जामीनाला ईडीचा विरोध)

मी स्वत:ला मराठी समजतो

याप्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रचारासंदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कामाचे कौतुक करतानाच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गावर काढले. बाळासाहेबांनंतर जर कुणी शब्दाचा पक्का असणारा नेता असेल तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही, जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. यावेळी त्यांनी मी स्वत:ला मराठीच समजतो असे सांगत आपल्या आईचे आडनाव हे फणसाळकर आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना महाराष्ट्राचा जावई असे संबोधायचे असा किस्सा सांगितला. (Milind Deora)

मराठी माणसांचा मोठा प्रश्न हा घर

याप्रसंगी बोलतांना त्यांनी अरविंद सावंत यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, अरविंद सावंत यांच्या इमारतीला ओसी नाही. अरविंद सावंत इमारतींमधील रहिवाशांना न्याय देऊ शकत नाही, तर चाळीतील, इमारतींमधील भाड्याने राहणाऱ्या लोकांच्या समस्या काय सोडवणार असा सवाल देवरा यांनी केला. या भागात मराठी माणसांचा मोठा प्रश्न हा घर आहे. पडक्या इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून नागरीक त्यात राहत होते. मात्र, माझ्या कार्यकाळात गिरणीतून पडक्या जागेत लोकांची राहण्याची सोय केली. तो प्रकल्प आता पूर्ण झाला असल्याचे देवरा यांनी सांगितले. (Milind Deora)

शिवसैनिक बनलो, आता मनसैनिकही बनलो

तत्पूर्वी मनसेच्या या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या मिलिंद देवरा यांचे स्वागत मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात मनसेचा शेला घातला. हा शेला निरखून पाहतच त्यांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, मी काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन शिवसैनिक बनलो आणि आज तुम्ही मला मनसैनिक पण बनवून टाकले, त्याबरोबरच मनसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला. (Milind Deora)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.