Accident in Nagpur: एका ट्रकने १२ गाड्यांना उडवलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

250
Accident in Nagpur: एका ट्रकने १२ गाड्यांना उडवलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Accident in Nagpur: एका ट्रकने १२ गाड्यांना उडवलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नागपूरच्या (Accident in Nagpur) मानकापूर (Mankapur) परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ट्रकने १२ गाड्यांना उडवले आहे. यामध्ये ९ कार, एक रूग्णवाहिका, दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या भीषण अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये अनेक कार चक्काचूर झाल्या आहेत. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. (Accident in Nagpur)

(हेही वाचा –baby food: सॅरलॅक नको! आता घरच्या घरीच बनवा बाळाचा पौष्टिक आहार)

अपघातग्रस्त (Accident in Nagpur) कारमधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त (Accident in Nagpur) प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघात इतका भीषण होता की, एक कार दुसऱ्या कारवर चढल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला. अपघातामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. भीषण अपघातानंतर वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. (Accident in Nagpur)

(हेही वाचा –Ambrai Ghat Udaipur : मंत्रमुग्ध करणारा उदयपूरमधील ‘आंबराई घाट’)

चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो समोर उभ्या असलेल्या वाहनांना धडकला. लाल सिग्नलमुळे सर्व गाड्या उभ्या होत्या. या कंटेनरने अगोदर एका कारला धडक दिली. (Accident in Nagpur) त्यानंतर काही कार, दुचाकी यासोबत फरफटत गेल्या. यामध्ये एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली. या अपघातात सिग्नलला थांबलेल्या रुग्णवाहिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. (Accident in Nagpur)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.