Ambrai Ghat Udaipur : मंत्रमुग्ध करणारा उदयपूरमधील ‘आंबराई घाट’

सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे पर्यटन स्थळ

156
Ambrai Ghat Udaipur : मंत्रमुग्ध करणारा उदयपूरमधील ‘आंबराई घाट’

पश्चिम भारतातील (Western India) राजस्थानमध्ये वसलेले आणि ‘तलावांचे शहर’ (City of Lakes) म्हणून ओळखले जाणारे उदयपूर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सुंदर वास्तुकला, नयनरम्य संस्कृती आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी उदयपूर शहर प्रसिद्ध आहे. तसेच या शहरात भव्य राजवाडे, चैतन्यमय बाजारपेठा आणि तलाव आहेत. या सर्व तलावांपैकी, पिचोला तलाव हे सर्वात प्रसिद्ध असून, पिचोला तलावाच्या पश्चिमेला आंबराई घाट हे स्थळ आहे. पर्यटक वारंवार सुट्टीच्यानिमित्ताने या ठिकाणी भेट देतात. आंबराई घाट हे त्याच्या सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे पर्यटन स्थळ आहे.  (Ambrai Ghat Udaipur)

(हेही वाचा – Wedding Hairstyles For Women : लग्नासाठी छान गाऊन घेतलाय, पण वेडिंग हेअरस्टाईल कशी असावी हा प्रश्न पडला असेल तर हे वाचा!

घाट, राजवाडे आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध 

कृत्रिम गोड्या पाण्यातील पिचोला तलाव हा १४ व्या शतकात तयार केला असून, हा तलाव बांधण्याचे श्रेय जयपूरच्या महाराणा उदय सिंग (Maharana Uday Singh) द्वितीय यांना दिले जाते. या तलावा भोवती अनेक घाट, मंदिरे आणि राजवाडे आहेत, या भागातील निर्मळ नैसर्गिक सौंदर्याचा आनंद पर्यटक बोटीतून फिरून घेऊ शकतात. तसेच पर्यटक फिरण्यासाठी किंवा त्यांच्या व्यग्र वेळापत्रकाच्या तणावातून आराम मिळवण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणात फेरफटका मारण्यासाठी पर्यटकांमध्ये आंबराई घाट हे लोकप्रिय पर्यटन स्थळ (Popular tourist destination) आहे. (Ambrai Ghat Udaipur)

(हेही वाचा – Eknath Khadse : आपण भाजपामध्ये प्रवेश करणार; पण…; एकनाथ खंडसेंनी प्रवेशासंबंधी केले खुलासे)

आंबराई घाट 

उदयपूरमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर घाटांपैकी एक म्हणजे आंबराई घाट, जो पिचोला तलावाच्या (Lake Pichola) पश्चिम बाजूला आढळतो. हा घाट सिटी पॅलेस, लेक पॅलेस आणि जगमंदिर बेटाच्या चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हा घाट नयनरम्य सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त, घाट हे राजस्थानचे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ आणि  नयनरम्य संगीत कलेच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. आंबराई घाटावर पर्यटकांना प्रवेश विनामूल्य आहे. या तलावात दोन बेटे आहेत आणि दोन्हीवर बेटांवर राजवाडे बांधलेले आहेत. दोन्ही राजवाडे राजस्थानी कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. (Ambrai Ghat Udaipur)

(हेही वाचा – Prashant Thakur : भाजपा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष; आमदार प्रशांत ठाकूर)

आरती व पूजेचा वेळ 

आंबराई घाटावर प्रामुख्याने सकाळची आरती व विधिवत पूजा असे नित्यनियमाचे कार्यक्रम होत असतात. घाटावर रोजची आरतीची वेळ ही सकाळी ५.०० व संध्याकाळी ७.०० असे असून हे स्थळ सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर प्रेक्षणीय दिसते. तसेच तसेच प्री-वेडिंग फोटोशूटसह विविध फोटो शूटसाठी एक सुंदर ठिकाण आहे. उदयपूरच्या नगर परिषदेने आंबराई घाटाची चांगली देखभाल केली असून, घाटावर संगमरवरी चौकटी बसवल्या आहेत. (Ambrai Ghat Udaipur)

खवय्यांसाठी मेजवानी

या घाटांच्या आसपासची सर्वोत्तम उपाहारगृहे/कॅफे ज्यांना तुम्ही भेट देणे आवश्यक आहे. राजस्थानातील उदयपूरमधील पिचोला तलावाचे घाट केवळ त्यांच्या चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध नसून, तलावाच्या आसपासच्या भागात आढळणाऱ्या अनेक खाण्याच्या पर्यायांसाठीही ते प्रसिद्ध आहेत. राजस्थानच्या स्थानिक पाककृतींपासून ते जगभरातील खाद्यपदार्थांपर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध येथे उपलब्ध आहेत. (Ambrai Ghat Udaipur)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.