Gold : सोन्याचे दर पोहचले 70 हजारावर; आणखी वाढण्याची शक्यता

190
Gold Loans : सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सुवर्ण कर्जातही वाढ

सध्या सोन्याच्या (Gold) दरात विक्रमी वाढ होत आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,882 रुपये आणि 22 कॅरेट दागिन्यांच्या सोन्याची किंमत 64,012 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. त्याचे भाव आणखी वाढतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. अमेरिकेत व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता असताना डॉलरच्या कमजोरीमुळे सोने उच्चांकावर पोहोचले आहे.

2024 च्या अखेरीस 72,000 रुपयांपर्यंत पोहोचणार 

सोन्याने (Gold) गेल्या 6 महिन्यांत जवळपास 25% परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत ते 57 हजारांवरून 70 हजारांवर पोहोचले आहे. या वर्षी म्हणजे केवळ तीन महिन्यांत 10% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा ट्रेंड पुढेही चालू राहू शकतो. 2024 च्या अखेरीस सोन्याची किंमत 72,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ सोन्यामध्ये आणखी 2 हजार रुपयांनी वाढ होण्यास वाव आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दागिने खरेदी करण्याची आणि सोन्यात गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी असू शकते. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नाही. सोन्याने विक्रमी पातळी गाठली असली तरी सोन्याचे भाव घसरण्याचे कोणतेही कारण नाही. त्याची गुंतवणुकीची मागणी वाढत आहे.

(हेही वाचा Eknath Khadse : आपण भाजपामध्ये प्रवेश करणार; पण…; एकनाथ खंडसेंनी प्रवेशासंबंधी केले खुलासे)

20 वर्षांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ

20 वर्षांपासून सातत्याने किंमती वाढत आहेत, गेल्या 20 वर्षांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. महागाई वाढली तर सोन्याचे  (Gold) भाव आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या निवडणुकांच्या निकालांचा सोन्यावरही परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. परिस्थिती अशी आहे की 2025 पर्यंत सोन्याच्या किमती वाढतच राहतील. गेल्या वर्षाचे बोलायचे झाले तर 2023 मध्ये सोने 8 हजार रुपयांनी महागले आहे. 2023 च्या सुरुवातीला सोने 54,867 रुपये प्रति ग्रॅम होते, जे 31 डिसेंबर रोजी 63,246 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले. म्हणजेच 2023 मध्ये त्याची किंमत 8,379 रुपयांनी (16%) वाढली. त्याचवेळी चांदीचा भावही 68,092 रुपयांवरून 73,395 रुपये प्रतिकिलो झाला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.