ST Bus : बसचा टायर निखळून ६२ प्रवाशांचा जीव धोक्यात

भरधाव एसटी बसचे चाक निखळून १०० फूट लांब जाऊन पडले

145
ST Bus : बसचा टायर निखळून ६२ प्रवाशांचा जीव धोक्यात
ST Bus : बसचा टायर निखळून ६२ प्रवाशांचा जीव धोक्यात

परभणीच्या गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या या भरधाव एसटी बसचे चाक निखळून १०० फूट लांब जाऊन पडले. सुदैवाने बसमधून प्रवास करणाऱ्या ६२ प्रवाशांचा जीव मात्र वाचला आहे. एसटी परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था किती बिकट झाली आहे याचा प्रत्यय या घटनेमुळे आला.

नेमका प्रकार काय?

गंगाखेड आगारातून सुटलेली बस गंगाखेडहून पालमकडे एकूण ६२ प्रवासी घेऊन निघाली होती. गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले तरीही बस धावत असल्याची बाब त्याच रस्त्यावरून जात असलेले पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली. त्यांनी तात्काळ एसटी बस चालकाला हातवारे करत ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर बसचालकाने बस त्वरित थांबवली. विशेष बाब म्हणजे ही बस भरधाव वेगात असल्याने टायर चक्क १०० फुटांपर्यंत जाऊन पडले.सुदैवाने पीक अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब एसटी बसचालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.

(हेही वाचा – राहुल शेवाळेंनी सांगितला ‘भारत’ आणि ‘इंडिया’चा अर्थ; म्हणाले, I.N.D.I.A. शब्दात पारतंत्र्याचा वास)

New Project 2023 08 10T160939.914

एसटीला फुटले पंख…

काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील एसटी बसचा एक व्हिडीओ चांगलाच प्रसिद्ध होत होता. या व्हिडीओमध्ये एसटी बसचे छत हवेत उडत असतानादेखील बस चालक एसटी भरधाव वेगाने चालवत होता. यावरुन सध्या राज्यात सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करणारी लालपरीची अवस्था किती दयनीय आहे हे दिसून येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.