Dombivli MIDC मध्ये २४ तासांच ब्लॅकआऊट; भूमिगत केबल फॉल्टमुळे निवासी विभागातील ६ सोसायट्यांत बत्तीगुल

१० कुटुंबांचे पाणी-वीजेविना जनजीवन विस्कळीत

111
भूमिगत केबल फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ठिकाणाचे दृश्य.
Dombivli MIDC मध्ये २४ तासांच ब्लॅकआऊट; भूमिगत केबल फॉल्टमुळे निवासी विभागातील ६ सोसायट्यांत बत्तीगुल
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli MIDC                 डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवाशांसाठी शनिवार-रविवार काळरात्र ठरला. शिवाई बालक मंदिर शाळेजवळील शर्वरी, संध्या, स्वागत व्हिला, सह्याद्री दर्शन, स्नेहगंधा छाया, शिवसागर म्हणजेच आर एच १८ ते २४ या ६ रहिवासी सोसायट्यांचा वीजपुरवठा शनिवारी रात्री १ वाजता खंडित झाला तो रविवारी रात्री १ वाजता सुरू झाला. तब्बल सलग २४ तास वीजपुरवठा बंद झाल्याने या परिसरातील जवळपास १० कुटुंबांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. महावितरणच्या माहितीनुसार, वीज खंडित होण्याचे कारण भूमिगत केबल खराब झाली हे आहे. केबल जमिनीच्या खाली पाच फूट खोल असल्याने दुरूस्तीला वेळ लागला. वीज बंद असल्याने सोसायट्यांचे पाण्याचे पंपही बंद राहिले. त्यामुळे वीज आणि पाणी या दोन्ही अत्यावश्यक सेवांविना रहिवाशांना २४ तास काढावे लागले. (Dombivli MIDC)

रेकॉर्ड ब्रेकने रहिवासी हैराण

कडक उन्हाळ्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रूग्ण आणि घरातील इतर सदस्यांचे प्रचंड हाल झाले. इन्व्हर्टर संपले, मोबाईल बंद पडले, अन्न शिजवणे बंद झाले. सलग २४ तास वीज बंद होण्याचा हा रेकॉर्डच झाल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली. ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष बबन काळे, चंद्रकांत बोबडे, ज्योती पाटील, निलेश काळे, दिनेश नायक, शत्रुघ्न सोनावणे यांच्यासह अनेक रहिवाशांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून वीज तातडीने सुरू करण्याची मागणी केली. (Dombivli MIDC)

(हेही वाचा – Kailash Mansarovar Yatra पहिला गट ३० जूनला रवाना होणार, परराष्ट्र मंत्रालयाकडून नियमावली जारी; जाणून घ्या …)

वारंवार फॉल्टचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वीच निवासीतील सुदर्शन नगर भागात भूमिगत केबल फॉल्टमुळे सलग १५ तास वीज बंद होती. एमआयडीसीच्या निवासी विभागात २ ते ४ तासांसाठी वीज जाणे आता नित्याचे झाले आहे. त्यात एमआयडीसीने आठवड्यातून एकदा सलग दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या अडचणीत आता दुहेरी वाढ होणार आहे. (Dombivli MIDC)

महावितरणवर प्रश्नांचा भडिमार

वारंवार होणाऱ्या बत्तीगुलच्या समस्येने हैराण झालेल्या या भागातील रहिवाशांनी महावितरणवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. यावर महावितरणने स्पष्टीकरण दिले आहे. भूमिगत केबल पाच फूट खोल असल्याने उत्खन आणि दुरूस्तीला वेळ लागल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र वारंवार केबल फॉल्ट का होत आहेत? जुनी केबल बदलून नवीन क्षमता वाढविली जाणार आहे का? असे अनेक प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले. (Dombivli MIDC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.