-
प्रतिनिधी
Noise Pollution गणेशोत्सवासह इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या काळात कर्णकर्कश डीजे, प्रचंड क्षमतेच्या साऊंड सिस्टिम्स आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुकांमुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर त्रासाला सामोरे जावे लागते. या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाविरोधात आणि ध्वनीप्रदूषणाच्या वाढत्या उपद्रवाविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी सातत्याने आवाज उठवला होता. (Noise Pollution)
(हेही वाचा – Transfer : उत्तर प्रदेशमध्ये ३४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कानपूर, महोबासह १४ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बदलले)
नियम पायदळी तुडवणाऱ्या डीजे संस्कृतीला आणि लेझर शोंना आक्षेप घेतल्याने बापट यांना काही घटकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला; इतकेच नव्हे, तर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना भररस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही करण्यात आला होता. मात्र, अशा दहशतीपुढे न झुकता त्यांनी आपला लढा अविरत सुरूच ठेवला. बापट यांच्यावर झालेला हा हल्ला आणि सण-उत्सवांत सर्रासपणे होणारे नियमांचे उल्लंघन या संपूर्ण प्रकरणाची आता थेट मुंबई उच्च न्यायालयाने ‘सुमोटो’ (स्वतःहून) अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. (Noise Pollution)
(हेही वाचा – Barapullah Phase-III Corridor चे 29 सप्टेंबरला उद्घाटन; पूर्व दिल्ली ते AIIMS प्रवास होणार अधिक सुलभ)
सण-उत्सव साजरे करण्यास न्यायालयाचा अजिबात विरोध नसून, उत्सवाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या शांततेच्या आणि आरोग्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा येता कामा नये, अशी रोखठोक भूमिका खंडपीठाने घेतली आहे. डीजे आणि बेकायदेशीर साऊंड सिस्टिम्सवर आतापर्यंत काय कारवाई झाली, याविषयी राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून, न्यायालयाच्या या आक्रमक पावलामुळे विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी मोहिमेला हा एक प्रचंड मोठा नैतिक विजय मानला जात आहे. (Noise Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

