-
प्रतिनिधी
IIT Bombay मुंबईतील अर्थात IIT बॉम्बे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कॅम्पसमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संताप, आंदोलन आणि सुरक्षेबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनावरही दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्टेलमधील पंख्यांबाबत मोठा बदल करण्यात येत आहे. (IIT Bombay)
IIT बॉम्बेच्या हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये असलेले सीलिंग फॅन काढून त्यांच्या जागी वॉल-माउंटेड म्हणजेच भिंतीवर बसवले जाणारे पंखे लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्या पंख्यांची पहिली खेप कॅम्पसमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हा बदल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. (IIT Bombay)
(हेही वाचा – Today Horoscope 22 September 2026 : श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस कसा जाणार? तुमच्या राशीसाठी काय संकेत?)
या निर्णयाचा संबंध अलीकडील विद्यार्थ्याच्या मृत्यूशी जोडला जात असला, तरी IIT बॉम्बे प्रशासनाने याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. पंखे बदलण्याचा निर्णय अचानक घेण्यात आलेला नसून, हॉस्टेलच्या नियोजित नूतनीकरणाचा तो एक भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पंखे बदलण्याच्या प्रस्तावावर सुमारे दोन महिन्यांपासून विचार सुरू होता आणि त्याला यापूर्वीच अंतिम स्वरूप देण्यात आले होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (IIT Bombay)
मात्र, विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरच या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या एका गटाने केवळ पंखे बदलणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, तक्रार निवारण व्यवस्था आणि प्रशासनाशी संवाद यामध्येही ठोस सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर एकूण १८ मागण्यांचे निवेदनही ठेवले आहे. (IIT Bombay)
(हेही वाचा – Transfer : उत्तर प्रदेशमध्ये ३४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कानपूर, महोबासह १४ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बदलले)
या मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, मानसिक आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ, २४ तास मानसोपचारतज्ज्ञाची उपलब्धता, समुपदेशकांची संख्या वाढवणे आणि विद्यार्थी प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत अधिक सहभाग देणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. प्रशासनाने या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. (IIT Bombay)
दरम्यान, साहिल वाकोडे या बीटेकच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याचा १८ सप्टेंबर रोजी हॉस्टेलच्या खोलीत मृत्यू झाला. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये सलग काही दिवस विद्यार्थी आंदोलन झाले. त्यानंतर IIT बॉम्बेने डीन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अफेयर्स सूर्यनारायण दुल्ला यांना पदावरून हटवले असून, संस्थेने यापूर्वीच्या संवादाबाबत सार्वजनिक माफीही मागितली आहे. प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. (IIT Bombay)
अखेर IIT बॉम्बे प्रशासनाने हॉस्टेलमधील सीलिंग फॅन हटवून त्यांच्या जागी वॉल-माउंटेड फॅन बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नव्या पंख्यांची पहिली खेप कॅम्पसमध्ये पोहोचली असून, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय पूर्वनियोजित हॉस्टेल नूतनीकरणाचा भाग आहे; मात्र विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर या उपाययोजनेकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष लक्ष वेधले गेले आहे. (IIT Bombay)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

