Vidarbha च्या आध्यात्मिक विकासासाठी महायुती सरकारचे कोट्यवधींचे पॅकेज; तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट

68
महायुती सरकारच्या बैठकीत विदर्भ विकासाबाबत चर्चा
Vidarbha च्या आध्यात्मिक विकासासाठी महायुती सरकारचे कोट्यवधींचे पॅकेज; तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट
  • प्रतिनिधी

Vidarbha           विदर्भातील प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि संत भूमीच्या विकासासाठी राज्य सरकारने तिजोरीचे दरवाजे खुले करत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०२६-२०२७ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांद्वारे विदर्भाच्या आध्यात्मिक वैभवाला झळाळी देणारा मोठा निधी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थळांचे रूपडे पालटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या विकासात्मक निर्णयाच्या माध्यमातून विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाची साद घातली आहे. (Vidarbha)

​अमरावती जिल्ह्यातील संतांच्या भूमीला केंद्रस्थानी ठेवत सरकारने विशेष तरतूद केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाच्या सर्वांगीण विकासासाठी ५० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, वंदनीय संत गाडगेबाबा यांच्या वलगाव येथील निर्वाण भूमीसाठी ११ कोटी रुपये, श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पायाभूत सोयी-सुविधांसाठी १२ कोटी रुपये आणि तिवसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (Vidarbha)

(हेही वाचा – Kalyan : वर्तमानपत्र विक्रेत्या दाम्पत्याची कन्या झाली डॉक्टर; अनघा कांगणे एमबीबीएसमध्ये प्रथम श्रेणीत)

​राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही भाविकांच्या सोयीसाठी सरकारने मोठी आर्थिक रसद पुरवली आहे. शक्तिपीठ असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या विकास आराखड्यासाठी २० कोटी रुपये, तर शहरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिर, कुतेवाला बाबा मंदिर आणि मुरलीधर मंदिर या प्राचीन वारसा स्थळांच्या सुशोभीकरणासाठी १६.८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Vidarbha)

​केवळ विदर्भच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या सांस्कृतिक वारशाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने इतरही मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी ३००० कोटी रुपये, पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराच्या विकास आराखड्यासाठी ६०० कोटी रुपये आणि आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाला एक नवी गती मिळणार असून, भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. (Vidarbha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.