
-
प्रतिनिधी
FDA Action सण-उत्सवाच्या काळात मुंबईतील बाजारपेठांमध्ये गोडधोड खरेदीसाठी ग्राहकांची अलोट गर्दी उसळते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे समोर येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची (FDA) सूत्रे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सध्या प्रचंड ॲक्शन मोडवर आली आहे. ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची कसून तपासणी सुरू असून, स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काही दिवसांपूर्वीच याच परिसरातील दोन बड्या रेस्टॉरंट्सचे परवाने अशाच निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आले होते; अखेर सर्व त्रुटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना दिलासा देण्यात आला होता. (FDA Action)
(हेही वाचा – Barapullah Phase-III Corridor चे 29 सप्टेंबरला उद्घाटन; पूर्व दिल्ली ते AIIMS प्रवास होणार अधिक सुलभ)
अशाच एका विशेष मोहिमेदरम्यान तपासणी पथकाने एका अत्यंत नामांकित पेढीत अचानक धाड टाकली असता तेथील भयानक दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले. खाद्यपदार्थ तयार करणे आणि साठवणुकीच्या जागेच्या अगदी लगतच उघडी गटारे, सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आढळून आले. या दुर्गंधीयुक्त उघड्या ड्रेनेजमुळे झुरळे, माश्या आणि घातक कीटकांचा थेट अन्नाशी संपर्क येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. इतकेच नाही, तर तयार केलेली मिठाई पूर्णपणे उघड्या आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात ठेवण्यात आली होती; तसेच ती खराब होऊ नये म्हणून लागणारे तापमान व आर्द्रता नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. (FDA Action)
(हेही वाचा – Transfer : उत्तर प्रदेशमध्ये ३४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कानपूर, महोबासह १४ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बदलले)
हा संपूर्ण धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार दक्षिण मुंबईतील खवय्यांचे प्रमुख आकर्षण असलेल्या मोहम्मद अली रोडवरील प्रसिद्ध ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’ या दुकानात उघडकीस आला आहे. नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी ही अस्वच्छता आणि नियमांचे उघड उल्लंघन समोर येताच अन्न आणि औषध प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलत ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’चा फूड बिझनेस परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला असून, या धडक कारवाईमुळे संपूर्ण व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. (FDA Action)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
