
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan कष्टाने मेहनत केली की स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, हे वाक्य सार्थ करून दाखवलं आहे कल्याणच्या डॉ. अनघा विलास कांगणे यांनी. कल्याणच्या छत्रपती शाहू महाराज चौकातील गणेश टॉवरमध्ये राहणारे वृत्तपत्र विक्रेते ॲड. मंगल आणि विलास कांगणे या दाम्पत्याची कन्या अनघा हिने १० जून रोजी जाहीर झालेल्या एमबीबीएसच्या परीक्षेत ६६ टक्के गुणमिळवून प्रथम श्रेणीत घवघवीत यश मिळवले आहे. (Kalyan)
वृत्तपत्र वाटपाच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली, ही बातमी ऐकताच संपूर्ण गणेश टॉवरसह दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात अभिमानाची लहर पसरली आहे. अनघा या इंजिनिअर शुभम कांगणे यांच्या लहान भगिनी आहेत. भाऊ इंजिनिअर आणि बहीण आता डॉक्टर झाली. सर्वसामान्य कांगणे कुटुंबाने शिक्षणाच्या जोरावर कल्याणचे नाव उज्ज्वल केले आहे. (Kalyan)
(हेही वाचा – UK PM Keir Starmer: ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांचा राजीनामा; १० वर्षांत पायउतार होणारे सहावे पंतप्रधान)
कष्टाचं चीज झालं
रोज पहाटे वृत्तपत्र वाटप करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी डॉक्टर झाली, याचा आनंद परिसरातील प्रत्येकाला आहे. विलास आणि ॲड. मंगल कांगणे या दाम्पत्याचे वृत्तपत्रांचे वितरण करताना मुलीच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्याच मेहनतीचा परिणाम आज डॉ. अनघाच्या रूपाने समोर आला आहे. (Kalyan)
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. अनघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कांगणे परिवाराचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी मंडळी, सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते आणि सहकारी वृत्तपत्र विक्रेत्यांनी कांगणे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली, ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आल्याच्या प्रतिक्रिया परिसरात उमटत आहेत. (Kalyan)
(हेही वाचा – अवघ्या ८ दिवसांत सरकारचा ‘यू-टर्न’! RTI मध्ये माहिती मागण्याचे कारण सांगण्याची वादग्रस्त अट अखेर रद्द)
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा
श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील डॉ. अनघाचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. साधनांची कमतरता असली तरी जिद्द आणि चिकाटी असेल तर एमबीबीएस सारखी कठीण परीक्षा देखील प्रथम श्रेणीत पार करता येते, हेच डॉ. अनघाने सिद्ध केले आहे. डॉ. अनघासह संपूर्ण कांगणे परिवाराचे अभिनंदन करताना पुढील वैद्यकीय सेवेकरिता आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. कल्याणची लेक आता रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडेल, याचा विश्वास शुभेच्छुकांनी व्यक्त केला. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
