2000 Rupee Notes : ९७६० कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेल्या नाहीत

यावर्षी १९ मेपासून रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तरीही ९,७६० कोटी रुपये मूल्याच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमाच झालेल्या नाहीत, असं आता मध्यवर्ती बँकेनं जाहीर केलं आहे

92
2000 Rupee Notes : ९७६० कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेल्या नाहीत
2000 Rupee Notes : ९७६० कोटी रुपयांच्या २००० च्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेल्या नाहीत

ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी २००० रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानंतर नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या किंवा किती नोटा लोकांनी बदलून घेतल्या याची अधिकृत आकडेवारी प्रथमच जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, अजूनही ९,७६० कोटी रुपये मूल्याच्या २००० रुपयांच्या नोटा या बँकेकडे परतच आलेल्या नाहीत. आणि इतर १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या नोटांपैकी ९७.२१ टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत.

१९ मे पासूनच रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्या टप्प्याने या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा किंवा बँकांकडून बदलून घेण्याचा पर्याय लोकांना देण्यात आला होता. ती मुदतही आता संपलीय. त्यामुळे आता चुकून कुणाकडे २००० रुपयांच्या नोटा राहिल्या असतील तर तो फक्त शोभेचा कागद असेल.

(हेही वाचा-Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी)

ताज्या आकडेवारीनुसार, १८ मे २०२३ पर्यंत २००० रुपयाच्या वापरात असलेल्या नोटांचं मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये इतकं होतं. ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत ९,७६० कोटी रुपयांवर आलं आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची किंवा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. नंतर रिझर्व्ह बँकेनं ती ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

पण, आताही लोकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून हव्या असतील तर रिझर्व्ह बँकेच्या १९ निवडक कार्यालयांमध्ये तुम्ही त्या बदलून घेऊ शकता. शिवाय तुमच्याकडे असलेल्या २००० रुपयाच्या नोटा पोस्टानेही रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवता येतील. त्यासाठी एक फॉर्म भरून पोस्टाने पाठवलेल्या नोटा कुठल्या बँक खात्यात जमा करायचा त्याचे तपशील द्यावे लागतील. मग रिझर्व्ह बँकेच्या वतीने या नोटा तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.

सध्या २००० रुपये नोटांमधील व्यवहार मात्र बंद झाले आहेत. आणि या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत.f

(हेही पाहा-National Pollution Control Day : नॅशनल पॉल्युशन प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.