National Pollution Control Day : नॅशनल पॉल्युशन प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो?

भोपाळमध्ये गॅस दुर्घटनेत हजारो लोकांचा जीव गेला होता. भोपाळमधील युनियन कार्बाइड प्लांटमधून मिथाइल आयसोसायनेट गॅसची गळती झाली होती. त्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी देशभरात साजरा केला जातो.

129
National Pollution Control Day : नॅशनल पॉल्युशन प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो?
National Pollution Control Day : नॅशनल पॉल्युशन प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो?

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day) दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सतत वाढणाऱ्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र हा दिवस साजरा करण्यामागची प्रेरणा अत्यंत दुःखास्पद घटनेतून मिळाली आहे. (National Pollution Control Day)

भोपाळमध्ये गॅस दुर्घटनेत (Bhopal Gas Tragedy) हजारो लोकांचा जीव गेला होता. भोपाळमधील युनियन कार्बाइड प्लांटमधून मिथाइल आयसोसायनेट गॅसची गळती झाली होती. त्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी देशभरात साजरा केला जातो. (National Pollution Control Day)

वायु प्रदूषणाच्या (Air pollution) परिणामांमुळे दरवर्षी ७ दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होतो. आपल्या आरोग्यासाठी प्रदूषण हा घटक खूप महत्वाचा असला तरी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे मुख्य उद्दिष्ट औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचे नियंत्रण याबाबत जनजागृती करणे हा आहे. (National Pollution Control Day)

(हेही वाचा – Kaka Kalelkar : हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी धडपडणारे काका कालेलकर)

२०२३ ची राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाची थीम आहे “Beat Plastic Pollution.” प्लास्टिकने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. आपण वैयक्तिक आयुष्यात देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत असतो. (National Pollution Control Day)

प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि प्लास्टिकच्या प्रदूषणापासून (Plastic Pollution) आपल्या देशाचे रक्षण करणे हा या थीममागचा मुख्य हेतू आहे. येणार्‍या पिढीसाठी प्लास्टिक-मुक्त (Plastic-free) भविष्य करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे आतापासूनच प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणून भविष्य सुरक्षित करणे क्रमप्राप्त ठरेल. (National Pollution Control Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.