India vs China : सेवा क्षेत्रात भारताने चीनला टाकले मागे

India vs China : भारताची सेवा निर्यात आर्थिक वर्ष २०१४ मध्ये ११ टक्क्यांनी वाढली आहे.

113
India vs China : सेवा क्षेत्रात भारताने चीनला टाकले मागे
  • ऋजुता लुकतुके

भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारताने सेवा क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. भारताची सेवा निर्यात ११ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. भारताची ही फायद्याची गोष्ट आहे, तर आपला प्रतिस्पर्धी चीनला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या सेवा निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. (India vs China)

भारतासमोर मोठ्या प्रमाणात जागतिक आव्हानं आहेत. ही आव्हानं पेलून भारताने निर्यातीत मोठी वाढ केलीय. २०२३ या वर्षात निर्यातीत मोठी वाढ झालीय. २०२३ मध्ये भारताची सेवा निर्यात ११.४ टक्क्यांनी वाढलीय. दरम्यान एका बाजूला भारताची सेवा निर्यात वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला चीनची सेवा निर्यात कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चीनची सेवा निर्यात २०२३ मध्ये १०.१ टक्क्यांनी घसरली आहे. चीनची निर्यात ही ३८१ अब्ज डॉलर झाली आहे. (India vs China)

(हेही वाचा – North Central Lok Sabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईत पुनम महाजनांचा अखेर पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना दिली भाजपाने उमेदवारी)

आयफोन संदर्भातील व्यवसाय वाढवण्याचा कंपनीचा विचार

दिवसेंदिवस भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर अनेक बड्या कंपन्यांनी चीनमधील गुंतवणूक कमी केली आहे. त्यामुळं भारतीय बाजारेपेठेला फायदा होतोय. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचे केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ॲपलपासून ते टेस्लापर्यंतच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचा मोठा फायदा होतोय. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून परदेशात १२.१ अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा आयफोनचा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. (India vs China)

सध्या आयफोनला मोठी मागणी आहे. भारतात मोठ्या प्रमाणात आफोनचं उत्पादन केलं जातं. त्यामुळं वाढत्या मागणीला भारतातून योग्य प्रमाणात पुरवठा होत आहे. येणाऱ्या काळात आणखी आयफोन संदर्भातील व्यवसाय वाढवण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आयफोनला असणारी मागणी लक्षात घेता उत्पादनात मोठी वाढ झालीय. त्यामुळं निर्यातीत देखील वाढ होत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयफोनच्या निर्मितीत १०० टक्यांची वाढ झालीय. आयफोनच्या जागतिक पुरवठा साखळीत भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत भारतीय बनावटीच्या आयफोनला मोठी मागणी आहे. (India vs China)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.