North Central Lok Sabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईत पुनम महाजनांचा अखेर पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना दिली भाजपाने उमेदवारी

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आधी चित्रपट अभिनेत्री माधुरी दिक्षित, त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि नंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती.

117
North Central Lok Sabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईत पुनम महाजनांचा अखेर पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना दिली भाजपाने उमेदवारी

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपानेही आपला उमेदवार घोषित केला. भाजपाच्या विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा अखेर अपेक्षितपणे पत्ता कापण्यात आला असून त्या जागी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत आता भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम विरुध्द काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या लढत होणार आहे. विशेष म्हणजे उत्तर मध्य मुंबईतील दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्याने मतदान कुणाला करावे असे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरणार आहे. (North Central Lok Sabha Election 2024)

भाजपने मुंबईतील आपल्या तिन्ही विद्यमान खासदारांचे पत्ते कापले असून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आला आहे. पुनम महाजन यांना उमदेवारी न देण्याचा निर्णय सर्वांत प्रथम झाला होता. त्यामुळे या मतदार संघातून आधी चित्रपट अभिनेत्री माधुरी दिक्षित, त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि नंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. अखेर या मतदार संघातून भाजपाने निकम यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केला आहे. (North Central Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात ३५० बसेस आरक्षित, २ दिवस प्रवाशांचे हाल)

कुठलीही आव्हाने पेलण्याची आपली तयारी – निकम 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी बोलतांना आपण मुंबईत अनेक खटले चालवले असून देशाच्या सुरक्षेसाठी, सार्वभौमत्वासाठी तसेच संघटीत गुन्हेगारांच्या विरोधात काम केले आहे, त्यामुळे कुठलीही आव्हाने पेलण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. (North Central Lok Sabha Election 2024)

राजकारण आपल्यासाठी नवखे क्षेत्र आहे. लहानपणापासून आपली अभ्यासूवृत्ती आहे. मुंबईतील ज्वलंत प्रश्न आपल्याला माहित आहेत. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतील प्रश्न मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. तसेच त्या मुद्दयांसाठी संसदेत पाठपुरावा करून भाजपाला (BJP) कशाप्रकारे मदत होईल यासाठी प्रयत्न करेन. राजकारणात नवीन असलो तरी समाजहित प्रथम जोपासले जाईल. यासाठी विद्यमान खासदार पुनम महाजन यांचेही सहकार्य घेणार आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा खटला मीच चालवला होता. त्यामुळे महाजन कुटुंबांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत, असेही निकम यांनी स्पष्ट केले. (North Central Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.